मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रिया बापटकडे पाहिले जाते. अनेक चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम करून तिने अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमध्ये झळकली. प्रिया बापटने नुकतंच बोल्ड सीनबद्दल तिचा पती उमेश कामतला काय वाटतं? याबद्दल भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिया बापटने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजच्या पहिल्या भागात एक बोल्ड सीन केला होता. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावरल्या होत्या. एका लेसबीयन कीसिंग सीनमुळे प्रियाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. त्या सीरिजमधील तो सीन सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. नुकतंच प्रिया बापटने याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.
आणखी वाचा : “तुम्ही लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला का?” उर्मिला मातोंडकर म्हणाल्या “माझ्या नवऱ्याने…”

प्रिया बापट आणि उमेश कामत या दोघांनी नुकतंच ‘महाराष्ट्र टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बोल्ड आणि इंटिमेट सीनबद्दल भाष्य केले. इंटिमेट सीन करण्यापूर्वी तुम्ही दोघं एकमेकांशी चर्चा करता का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.

“आम्ही एकमेकांना नेहमी बोल्ड आणि इंटिमेट सीन असेल तर त्याबद्दल सांगतो. उमेशपेक्षा मीच जास्त असे सीन्स केले आहेत. मी केलेल्या सीरिजमध्ये आणि आगामी काही हिंदी चित्रपटात असे सीन्स आहेत”, असे प्रियाने सांगितले.

आणखी वाचा : “प्रथमेश लघाटेने प्रपोज केल्यानंतर होकार देण्यासाठी तीन दिवस का घेतले?” मुग्धा म्हणाली, “कारण मला…”

“आम्ही एकाच क्षेत्रातील असल्यामुळे असे प्रसंग किती टेक्निकल असतात, हे आम्हाला दोघांनाही माहिती आहे. ते चित्रीत कस झालंय, याचीही आम्हाला माहिती असते. त्यामुळे आम्ही त्याकडे फक्त कामाचा एक भाग म्हणूनच बघतो”, असेही प्रिया म्हणाली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress priya bapat talk about discuss before doing bold scene with umesh kamat nrp