मराठमोळ्या प्रिया बापटने (Priya Bapat) या आठवड्यातील आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. यादीत पहिल्या क्रमांकावर ईशान खट्टर आहे. प्रियाची वेब सीरिज ‘रात जवान है’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा शो मुलांचे संगोपन करताना आव्हानांना सामोऱ्या जाणाऱ्या तीन मित्रांच्या कथेवर आधारित आहे.

आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवल्यानंतर प्रिया बापटने आनंद व्यक्त केला आहे. “आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत या आठवड्यात मी दुसऱ्या क्रमांकावर आहे याचा मला खूप आनंद होतोय आणि यासाठी मी आयएमडीबीचे मनःपूर्वक आभार मानते. प्रत्येक कलाकाराचं टॅलेंट आणि मेहनत याला आयएमडीबीकडून मिळालेली ही एक पावती आहे. माझ्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते जे माझ्यावर आणि मी केलेल्या कामावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या वर्षी माझ्याा आगामी रिलीज होणाऱ्या प्रोजेक्ट्ससाठी खूप उत्सुक आहे. या सर्व कलाकृती खूपच छान आहेत आणि त्यावर प्रेक्षक आणि चाहते खूप प्रेम करतील अशी मला खात्री आहे.”

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरला? सूरज चव्हाण, अंकिता नव्हे तर ‘हा’ सदस्य मारणार बाजी, ‘तो’ फोटो चर्चेत

‘तुंबाड’ (Tumbbad Re-release) चित्रपट नुकताच पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. चित्रपटाच्या मूळ कलेक्शननंतर चित्रपटाने पुन्हा प्रदर्शित झाल्यावर जास्त कमाई केली. या सिनेमाचा हिरो सोहम शाहने (Sohum Shah) या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. विक्रांत मॅस्सीने आपल्या क्राइम ड्रामा चित्रपट ‘सेक्टर ३६’ च्या ओटीटी प्रीमियरनंतर या यादीत ९वे स्थान मिळविले आहे, तर त्याचा सहकलाकार दीपक डोबरियाल ३७व्या स्थानावर आहे. तृप्ती डिमरी आपल्या आगामी चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला वीडियो’ मुळे ८व्या क्रमांकावर आहे. तर तिचा सहकलाकार राजकुमार राव २१व्या स्थानावर आहे.

हेही वाचा –“मला वाटलं भारत सरकार प्रिंट जाळेल”, घाबरलेल्या अनुराग कश्यपने परदेशात नेलेल्या ‘या’ बंदी घातलेल्या सिनेमाच्या DVD

ईशान खट्टरने त्याचा पहिला क्रमांक सलग तिसऱ्या आठवड्यात कायम ठेवला आहे. तर ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), करीना कपूर (Kareena Kapoor), शाहरुख खान आणि सलमान खान अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, सहाव्या आणि तेराव्या क्रमांकावर आहेत.

Story img Loader