मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत आज नाशिकमध्ये भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
प्रिया बेर्डे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर घड्याळ बांधलं होतं. परंतु, अवघ्या दोनच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे.
प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’ असे एक सो एक हिट चित्रपट त्यांनी दिले. ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’ या हिंदी चित्रपटांतही त्याानी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.