मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्रिया बेर्डे यांना ओळखले जाते. नाटक, चित्रपट, राजकारण या सगळ्यांमध्ये त्या सक्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवला. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. प्रिया बेर्डे यांनी एकट्याने त्यांच्या दोन्हीही मुलांचा सांभाळ केला. नुकंतच एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीबद्दल भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रिया बेर्डे यांनी नुकतंच ‘लोकमत फिल्मी’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांचे करिअर, मुलांचा सांभाळ, राजकारण, लक्ष्मीकांत बेर्डे यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर तुमचं नातं कसं जुळलं, याबद्दल विचारणा केली. त्यावेळी त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली.
आणखी वाचा : “लक्ष्मीकांत यांनी मला राजकारणात…”, प्रिया बेर्डे यांचे थेट वक्तव्य, म्हणाल्या “बाई तू तुझा…”

“मी साधारण १९-२० वर्षांची होते. तेव्हापासून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम करायचे. एकत्र काम करत असताना आमच्यात मैत्री झाली. बाँडिंग वाढले. आमच्यात १६-१७ वर्षांचा फरक होता. त्याच काळात माझ्यावर घराची जबाबदारी होती. मला काम करायचं होतं. त्यात आईचंही निधन झालं होतं.

या कठीण काळात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मला आधार दिला. यानंतर मग आमच्यात घट्ट मैत्री झाली. माझी आई आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यात खूप चांगलं नातं होतं. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नी रुही या देखील माझ्या आईची चांगली मैत्रीण होती. त्यावेळी असं काही होईल, असं माझ्या डोक्यात नव्हतं.

माझ्या आईच्या निधनानंतर त्यांनी मला आधार दिला. मार्गदर्शन केलं. मी त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहत होते. माझ्या त्यांच्याबद्दल संमिश्र भावना होत्या. तेव्हा प्रेमात पडायचं वैगरे असं काही झालं नाही. मला आजही अनेक लोक होम ब्रेकर म्हणतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचं करिअर घडवण्यात रुही यांचा मोठा वाटा होता. ते नाकारून चालणार नाही”, असे प्रिया बेर्डे यांनी म्हटले.

आणखी वाचा : “फक्त १३ दिवस लोक येतात, त्यानंतर…” प्रिया बेर्डेंनी मांडली सत्य परिस्थिती, म्हणाल्या “लक्ष्मीकांत गेल्यानंतर…”

दरम्यान, प्रिया बेर्डे या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. प्रिया बेर्डेंबरोबर लग्न करण्यापूर्वी त्यांनी रुही बेर्डे यांच्याशी लग्न केले होते. रुही यांचं कॅन्सरच्या आजारानं निधन झालं. त्यानंतर प्रिया आणि लक्ष्मीकांत यांनी लग्न केलं होतं. प्रिया आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना दोन मुलं आहेत. अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे अशी त्यांची नाव असून ते दोघेही सिनेसृष्टीत सक्रीय आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress priya berde talk about laxmikant berde personal life and his first wife roohi berde nrp
Show comments