मराठीसह हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे. ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘या सुखांनो या’, ‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथीया’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा अनेक मराठी, हिंदी मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारून प्रिया घराघरात पोहोचली आहे. मालिका व्यतिरिक्त चित्रपट, नाटक या माध्यमांमध्ये प्रियाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री प्रिया मराठेने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे, “जेव्हा माझी चोरी पकडली जाते.” या व्हिडीओत प्रिया आंब्यांवर ताव मारताना दिसत आहे. यावेळी तिचा नवरा अभिनेता शंतनु मोघे व्हिडीओ काढत आहे. प्रिया आंबे खात असताना शंतनु जातो आणि म्हणतो, “तू काय करतेय?” तेव्हा प्रिया शंतनुला व्हिडीओ काढताना पाहून हसते. त्यानंतर अभिनेता म्हणतो, “लाज वाटते? एकटी एवढे आंबे खायला?” यावर अभिनेत्री म्हणते, “नाही.” मग शंतनु म्हणतो, “वजन वाढलं तर?” त्यावर प्रिया मस्तचं उत्तर देते. ती म्हणते, “जीमला जाणार.”

mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
bigg boss marathi season 5 fame Ankita Walawalkar meet yogita Chavan with future husband before wedding
लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून ‘डीपी दादा’ची प्रतिक्रिया, म्हणाला, “पचणार नाही…”
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेता अमित भानुशाली ‘या’ मराठी अभिनेत्रीला म्हणाला करीना कपूर, फोटो व्हायरल

हेही वाचा – Video: माधुरी दीक्षितच्या कोळी लूकमध्ये दिसली अंकिता लोखंडे; व्हिडीओ पाहून कोणी उडवली खिल्ली, तर कोणी केलं कौतुक

प्रिया आणि शंतनुचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अगदी बरोबर. जीमला जा पण आंबे खाल्लेच पाहिजेत”, “छान चाललं होतं. लाजायचं काय त्यात. कोणता आंबा आहे?”, “किती निरागस आहे प्रिया”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्रियाच्या या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘या’ मराठी अभिनेत्रीमुळे शशांक केतकरने घेतला लाइव्ह क्रिकेट मॅचचा आनंद, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

दरम्यान, प्रियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे’ लोकप्रिय मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने साकारलेली मोनिकाची भूमिका चांगलीच गाजली होती. पण प्रियाने अचानक काही कारणास्तव ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका सोडली. सध्या तिचं रंगभूमीवर ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ नाटक सुरू आहे. या नाटकात प्रियाबरोबर सुबोध पंडे, संयोगिता भावे, राहुल पेठे, पल्लवी वाघ-केळकर आणि अनिकेत विश्वासराव काम करत आहेत.

Story img Loader