अभिनेत्री प्रिया बेर्डे या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. प्रिया बेर्डेंनी सात वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत त्या सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठेंच्या भूमिकेत झळकणार आहेत. नुकतंच प्रिया बेर्डेंनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यानंतर एकटीने मुलांचं संगोपन कसं केलं? याबद्दल भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिनय आणि स्वानंदी अशी दोन मुलं आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डे यांनी एकट्याने मुलांचे पालनपोषण आणि संगोपन केले. नुकतंच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या संघर्षाबद्दल सांगितले.
आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?

यावेळी त्या म्हणाल्या, “मी माझ्या मुलांचा एकटीने सांभाळ करत होते. सिनेसृष्टीत करिअर करत असताना मला माझ्या मुलांना बाहेर ठेवावं लागलं. माझी मुलं पुण्यातील एका हॉस्टेलमध्ये मोठी झाली. कारण मला आई-वडील नाही, सासू-सासरे नाही, बहिण-भाऊही नाहीत. जरी असते तरी त्यांनी माझ्या मुलांना सांभाळावं अशी मी कधीच अपेक्षा केली नसती.”

“माझ्या सासरकडची सर्व मंडळी आहेत, पण प्रत्येकाचा प्रत्येकाला संसार आहे. लक्ष्मीकांत गेल्यानंतर माझ्या आयुष्यात कोणीही नव्हतं. त्यावेळी मला नाईलाजास्तव माझ्या मुलांना हॉस्टेलला ठेवावं लागलं. ते पुण्यातील सिंहगड परिसरात असणाऱ्या हॉस्टेलला राहत होते. माझी दोन्हीही मुलं दहावीपर्यंत तिथेच होती. मी त्यांना महिना-दोन महिन्यांनी मोठं होताना बघत होते”, असे प्रिया बेर्डे यांनी सांगितलं.

आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

दरम्यान प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट चांगलाच गाजला. तर मुलगी स्वानंदी बेर्डेने नाटकाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘धनंजय माने इथंच राहतात..’ या नाटकात ती झळकताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prreeya berde talk about children abhinay berde swanandi berde stay in hostel after laxmikant berde death nrp
First published on: 21-08-2023 at 12:29 IST