मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री राधिका देशपांडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. राधिका सध्या ‘सियावर रामचंद्र की जय’ या तिच्या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. नाटकाच्या प्रयोगासाठी राधिका नागपूरात गेली होती. त्यादरम्यान समृद्धी महामार्गावर आलेला गाडी चालवण्याचा अनुभव तिने शेअर केला आहे.

राधिका देशपांडेंची पोस्ट

रामराज्यातले ‘नल नील‘ श्री नितीनजी गडकरी.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
marathi actress amruta Deshmukh share brother abhishek Deshmukh funny video
‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”
Arjun Kapoor And Malaika Arora
“त्रासदायक लोकांना…”, अर्जुन कपूरने ब्रेकअप बद्दल खुलासा केल्यानंतर मलायका अरोराने केलेली पोस्ट
savlyachi janu savali fame megha dhade gift to veena jagtap
Video: ‘सावळ्याची जणू सावली’मधील वीणा जगतापला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने दिलं सुंदर गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझी मोठी समस्या…”
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”

‘सियावर रामचंद्र की जय’ हे बाल महानाट्य नागपूरात होत आहे. त्याच्या प्रयोजनासाठी, प्रस्तुतीसाठी आमची गाडी समृद्धी महामार्गावर निघाली. मी, माझी मुलगी, मैत्रीण आणि तिची मुलं, असे आम्ही…५६७ किमीचा ‘मक्खन मलाई‘ प्रवास केला.

स्त्री शक्ती आणि समृद्धीचा मिलाप जणू. महाराष्ट्रातला हा महामार्ग आम्ही पार करणार होतो. घरचे वर्तमानपत्रात येतात त्या बातम्या वाचून काळजीत होते. पण ज्यांनी महामार्ग पार केलाच नाही तेच अधिक बोलताना दिसले. म्हणून मी माझा अनुभव इथे लिहिते आहे. बोलकं व्हायला हवं. चांगलं ते पोहोचवायलाच हवं.

“एकटी ड्राईव्ह करणार?” रामाच्या त्या सेतूवरून खारुताईने सुद्धा आपले योगदान देत प्रवास केलाच की. मग मी का नाही? मी निघाले. हा समृद्धी सेतू आहे जो दोन मोठ्या शहरांना जोडतो. वाटेवरच्या छोट्या शहरांना सुद्धा आपल्या अजस्त्र मार्गाने जोडतो. सरळ आहे. जो नियम पाळतो, सुरक्षित अंतर ठेवून चालवतो, जो ओव्हर स्पीड करत नाही, जो लक्ष विचलित होऊ देत नाही त्याच्यासाठी हा महामार्ग सोप्पा मार्ग आहे.

वाईट वाटतं त्यांच्यासाठी ज्यांच्यापर्यंत हा मार्ग पोहोचू शकत नाही. वाईट वाटतं त्या लोकांसाठी ज्यांना चांगलं काही दिसत नाही, बघवत नाही. वाईट वाटतं त्यांच्यासाठी ज्यांना फक्त टीकाच करता येतात.

एक सुचवू? वाटेत मुंबईचा वडापाव, पुण्याची बाकरवडी आणि नागपूरची संत्री मिळतील अशी सोय करा म्हणजे खारुताई खुश!
नितीनजी असे हजारो सेतू राम राज्यात बांधण्यात यावेत. नल आणि नील सारखे काम करण्यासाठी लागणारे “विल” तुमच्याकडे आहे. हाताशी आपलीच वानरसेना आहे. शहराशहराला जोडण्याचे काम तुम्ही चालू केले आहे. आमची खारूताईंची टीम तयार ठेवते तुमच्या कामात वाटा उचलायला. आता तुटतील ती दुर्जनांची मनं, खचतील ती दुष्कृत्य करणाऱ्यांची शरीरे.

आमच्या नाटकातलं एक वाक्य आहे, “प्रभु श्रीराम का नाम लेते ही सारे मार्ग खुल जाते हैं”. आमच्या नाटकाला नक्की या. १७ जुन, ७ वाजता, कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर.
खूप प्रेम, नितांत आदर, नितीनजी.

हेही वाचा>> “राजा माणूस…”, राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाले…

राधिकाच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.