ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. २१ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भारतात चांगला गल्ला जमवला आहे. अणुबॉम्बचे जनक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियस रॉबर्ट यांची कहाणी या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. मात्र या चित्रपटातील काही दृश्यांवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. यावर अनेक कलाकारही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकतंच ओपेनहायमर चित्रपटाबद्दल ‘फँड्री’ फेम शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरातने पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागराज मंजुळेंच्या ‘फँड्री’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. तिने या चित्रपटात शालूची भूमिका साकारली होती. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : सेक्स करताना भगवद्गीतेचं वाचन; ‘ओपनहायमर’मधील त्या सीनवर भडकले नेटकरी; म्हणाले “लाज वाटली…”

राजेश्वरी खरातची पोस्ट

” Oppenheimer “
हिन्दू-मुस्लिम, धर्म, जात-पात, रंग इत्यादि विषयांमध्ये लोक एकत्रित येऊन दंगे मोर्चे आणि काय काय करतात, पण या गोष्टींमुळे आपण आपल्याच देशातील लोकांचा द्वेष करत आलोय.
आज बाहेर देशातील काही लोकांनी आपल्या धार्मिकतेचा अपमान केला आहे, यावर कोणी जास्तं काही बोलेनात.
सर्वांना विनंती आहे की या प्रकरणाचा तीव्र निषेध करा आणि या सिनेमाचा योग्य तो निर्णय लागावा ही जबाबदारी सरकारने लवकरात लवकर घ्यावी, असे राजेश्वरी खरातने म्हटले आहे.

ओपनहायमर यांनी हिंदू धर्मातील वेद आणि भगवद्गीतेचा प्रचंड अभ्यास केला होता, त्यासाठी ओपनहायमर संस्कृत शिकले होते. चित्रपटातही या गोष्टीचा उल्लेख दोन ठिकाणी आला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारा सिलियन मर्फी आणि चित्रपटातील अभिनेत्री यांच्यात चित्रित झालेल्या सेक्स सीनदरम्यान सिलियन मर्फी म्हणजेच ओपनहायमर हे भगवद्गीतेचं वाचन करताना दाखवण्यात आलं आहे.

आणखी वाचा : “बायकोचं मन…”, ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर केदार शिंदेंच्या पत्नीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणाले “ती माझ्यासाठी…”

या सीनमध्ये अभिनेत्री टॉपलेस आणि आणि तिने संमोर भगवद्गीता धरली असून अभिनेता सिलियन मर्फी त्यातील श्लोकाचा अर्थ तिला सांगताना सेक्स करत आहे अशाप्रकारचे दृश्य चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या दृश्याला अनेकांनी ट्वीट करत विरोध करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress rajeshwari kharat facebook post on oppenheimer quotes bhagavad gita controversial scene nrp