मराठमोळी अभिनेत्री रसिका आगाशे हिने आतापर्यंत अनेक मराठी सिनेमे, नाटकं व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. रसिकाने दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इथून अभिनयाचे धडे गिरवले. मुळची पुणेकर असलेल्या रसिकाने एनएसडीमध्ये जाण्याचा निर्णय कसा घेतला, यामागचं कारण तिने सांगितलं आहे.
जेव्हा सर्वांसमोर रजनीकांत यांच्या तोंडावर थुंकल्या होत्या श्रीदेवी; काय घडलं होतं? वाचा
रसिका म्हणाली, “माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून वेगवेगळे चित्रपट दाखवले होते. ते चित्रपट पाहून मला वाटलं की अभिनयाच्या वेगवेगळ्या पद्धती बघाव्यात, त्या एक्सप्लोर कराव्यात हे लहानपणीच माझ्या डोक्यात आलं होतं. महाराष्ट्रात मराठी रिअॅलिजम हा वेगळा फॉर्म आहे. पण मला रशियन रिअॅलिजमही शिकायचं होतं. मला इतर अनेक पद्धती शिकायच्या होत्या. त्यासाठी एनएसडी ही उत्तम जागा होती.”
“मी सिगारेट ओढत होतो अन्…”, सुबोध भावेने मंजिरीला रक्ताने लिहिलेलं पत्र; खुलासा करत म्हणाला…
‘आपलं महानगर’ला दिलेल्या मुलाखतीत रसिका म्हणाली, “एनएसडीला गेल्यावर मला काहीच येत नाही ही भावना मनात आली. कारण मला फक्त एका पद्धतीचच नाटक करता येत होतं. तिथे खूप जास्त शिकायला मिळालं. इतर कशाच्याही शिवाय मी माझं नाटक बनवू शकते हा आत्मविश्वास मला तीन वर्षात आला. तिथे विविध राज्यातील लोकांशी मैत्री झाली. त्यामुळे माझ्यात जो एक पुणेकरपणा होता, तो तुटायला तिथून मदत झाली. सगळ्याच विषयांवरच्या काहीतरी अत्यंत बालिश संकल्पना असतात आणि पुणेकर असल्यामुळे हेच खरंय असं मला ठाम वाटायचं ते सगळं तिथे तुटलं. माणूस म्हणून वाढायला मदत झाली.”
दरम्यान, रसिका अखेरची ‘द स्कूप’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या रसिकाने नंतर दिग्दर्शनही केलं. मराठी नाटकांच्या दुनियेतून रसिकाचा प्रवास सुरू झाला तो नंतर विस्तारत गेला. तिच्यातल्या अभिनेत्रीला तिच्यातली लेखिका व दिग्दर्शिका सापडली.