माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. रसिका ही लवकरच फकाट हा चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिने तिचा सहकलाकार अभिनेता सुयोग गोऱ्हे याच्याबरोबर किसिंग सीन केला आहे. आता तिने हा सीन शूट करणं किती अवघडं होतं, याबद्दल भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पडद्यावर किसिंग सीन देणे ही आता फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. कलाकारही चित्रपटाचा भाग म्हणून असे सीन करण्यास तयार होतात. परंतु किसिंग सीन करण्यासाठी सगळेच कलाकार तयार असतात असे नाही. असाच एक किस्सा ‘फकाट’च्या चित्रीकरणादरम्यान सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनीलबरोबर घडला.
आणखी वाचा : “माझी अनेक लग्न झालीत, मला दोन मुलं आहेत अन् माझे दुबई, अमेरिकेत…” जुई गडकरीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

या चित्रपटात सुयोगला रसिकाला किस करायचे होते. मात्र हे दृश्य चित्रीकरणावेळी तो खूप अस्वस्थ झाला होता. हे दृश्य चित्रीत करणे सुयोगला खूपच अवघड जात होते. कारण यापूर्वी त्याने किसिंग सीन कधीच केला नव्हता. मात्र या सगळ्यात त्याला त्याचीच सहकलाकार रसिका सुनीलने साथ दिली. त्यानंतर अखेर तो सीन चित्रित झाला. हा सीन कसा चित्रित झाला याचा किस्सा रसिकानेच आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

“आम्हाला दोघांना किसिंग सीन करायचे आहे, हे जेव्हा सुयोगला कळले, तेव्हा तो खूप घाबरला होता. कारण आधी त्याने असा सीन कधीच दिला नव्हता. मला हा सीन शूट करण्यासाठी काहीही अडचणी नव्हत्या. पण सुयोगला हे जरा विचित्र वाटत होतं. त्याला मी सांगितलं आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि कामाच्या बाबतीत प्रोफेशनलही आहोत. त्यामुळे हा सीन करायला तुला एवढं अनकम्फर्टटेबल व्हायची गरजच नाही. तेव्हा आमच्या दोघांचं लग्नही झालं नव्हतं. तरीही त्याला हे करायला खूप दडपण येत होतं. अखेर मी आणि दिग्दर्शक श्रेयश जाधवने भरपूर समजवल्यानंतर तो किसिंग सीन देण्यासाठी तयार झाला आणि त्यानंतर हा सीन चित्रित झाला.” असे रसिका सुनील म्हणाली.

आणखी वाचा : “गरोदर आहेस का?” अभिज्ञा भावेच्या फोटोंमुळे चर्चांना उधाण, पती कमेंट करत म्हणाला…

“आता आमच्या दोघांचंही लग्न झालं आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं तू किसिंग सीन दिलास तुझा नवरा तुला काही बोलला नाही का? त्यावर मी एकच सांगेन, माझं क्षेत्र काय आहे, हे माझ्या नवऱ्याला माहित आहे. त्यामुळे इथे भूमिकेची गरज म्हणून हे सगळं करावं लागतं. याची त्याला पूर्ण कल्पना आहे.”, असे रसिका सुनीलने म्हटले.

आणखी वाचा : “लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून तुला सोडून…” अंकुर वाढवेने पत्नीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित ‘फकाट’ हा चित्रपट येत्या २ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे.