दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरु. या चित्रपटामुळे ती घराघरात पोहोचली. तब्बल सात वर्ष उलटून गेली तरीही सामान्य लोक तिला ‘आर्ची’ याच नावाने ओळखतात.मात्र रिंकू राजगुरुने सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट डिलीट केल्या आहेत.
रिंकू राजगुरु ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिच्या फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसते. मात्र आता रिंकूने सोशल मीडियावर एक मोठं पाऊल उचललं आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत.
आणखी वाचा : “राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा…”, कोकण हार्टेड गर्लने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “ते मुख्यमंत्री…”
रिंकू राजगुरुच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नाव ‘iamrinkurajguru’ असं आहे.रिंकूच्या इन्स्टाग्राम वॉलवर सध्या दोनच पोस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातील एक पोस्ट ही रक्षाबंधनाच्या वेळी ३० ऑगस्टला केलेली आहे. यात तिनं तिच्या भावाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. तर दुसरी पोस्ट ही २६ जून २०२३ ची आहे.यात तिने एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. “खाली कमरा मेरी पहली कोशिश” असं कॅप्शन तिने त्या रीलला दिले आहे.
विशेष म्हणजे रिंकूने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात ती मांजरीबरोबर मस्ती करताना दिसत आहे.रिंकूचे इन्स्टाग्रामवर 773k फॉलोवर्स आहेत. तर ती फक्त २५ जणांना फॉलो करते.
आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य
दरम्यान रिंकूने या पोस्ट डिलीट केल्या? की रिंकूचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे? याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच तिने या पोस्ट प्राफाईलमधून हाईड केल्या आहेत का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र अद्याप तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.