मुंबईत वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत सुरु असलेली मेट्रो स्थानक आणि रस्त्यांच्या दुरस्तीची काम यामुळे असंख्य मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सर्वसामान्य मुंबईकरच नव्हे तर अनेक कलाकारही या वाहतूक कोंडीचा सामन करताना दिसतात. नुकतंच अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या सुपरहिट चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरुला ओळखले जाते. या चित्रपटामुळे ती घराघरात पोहोचली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल सात वर्ष उलटून गेली असली तरी अनेक लोक तिला ‘आर्ची’ याच नावाने ओळखतात. रिंकू लवकरच ‘झिम्मा २’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
आणखी वाचा : मिलिंद गवळींनी चाखली सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलमधील पदार्थांची चव, म्हणाले “त्याने अतिशय…”

नुकतंच रिंकू राजगुरुने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवर तिने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने मुंबई ट्राफिक असे म्हटले आहे. त्याबरोबर तिने कंटाळलेल्या अवस्थेमधील एक इमोजीही पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : निर्मिती सावंतची धमाल, रिंकू राजगुरुचा नवा अंदाज अन्…; ‘झिम्मा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

दरम्यान रिंकू राजगुरु ‘झिम्मा २’ या चित्रपटात तानिया हे पात्र साकारत आहे. यात ती निर्मिती सांवत यांच्या सूनबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress rinku rajguru stuck in mumbai traffic share instagram post nrp