‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ व ‘बॉईज ३’ हे तिन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर आता लवकरच ‘बॉईज ४’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या चौथ्या भागातही कॉलेजवयीन मुलांची धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा काही भाग हा लंडनमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री रितिका श्रोत्रीने अभिनेता पार्थ भालेरावचा एक किस्सा सांगितला आहे.
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून रितिका श्रोत्री ही सतत चर्चेत असते. टकाटक, बॉईज, डार्लिंग यासांरख्या चित्रपटानंतर आता लवकरच ती बॉईज ४ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच तिने युट्यूबला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने पार्थ भालेरावचा किस्सा सांगितला.
आणखी वाचा : “आपल्याकडे मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी…” ललित प्रभाकरने ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या निमित्ताने व्यक्त केली खंत, म्हणाला “तुम्हाला एका पैशाचा…”
“आम्ही सर्व लंडनमध्ये शूटिंगसाठी गेलो होतो. तेव्हा पार्थ भालेरावचा व्हिसाच आला नव्हता. त्यामुळे मग आम्ही १५ दिवस तिथे फक्त बसून होतो. पण यात निर्मात्यांचं मला खरंच कौतुक आहे की त्यांनी बॉईज ४ हा चित्रपट करायचाच हे ठरवलं होतं आणि पार्थची वाट पाहायची. त्यानंतर मग त्याचा व्हिसा आला. मग तो तिकडे आला. त्यानंतर आम्ही खूप पटापट शूट केलं, असे रितिका श्रोत्रीने म्हटले.
पण आता हा चित्रपट पाहून खूपच सुंदर वाटत आहे. त्यामुळे मग आम्ही खूप हसतो. पार्थ आला नाही त्या १५ दिवसात आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. पण आम्ही खूप फिरलो आणि खूप शॉपिंग केली. खूप कपडे घेतले. मी तिथे खूप वेगवेगळे पदार्थांची चव चाखली”, असेही तिने सांगितले.
आणखी वाचा : “मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे?” मनसेचा संतप्त सवाल, म्हणाले “दुर्दैवाने, आज ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट…”
दरम्यान ‘बॉईज ४’ चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट २० ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.