कलाकार मंडळी चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. शिवाय आपल्या नवीन प्रोजेक्टबाबत अपडेट देत असतात. अशीच एक सोशल मीडियावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतुजा कधी डान्स व्हिडीओमुळे तर कधी हॉट आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा – “मराठी चित्रपटाबद्दल एक मोठा भ्रम आता मोडला”; केतकी माटेगावकरचं विधान, म्हणाली, “कोण म्हणतं ….”
नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमात अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने आपल्या अभिनयाने एक वेगळी छाप उमटवली आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे. पण त्यानंतर तिची सर्वाधिक चर्चा ही ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटामुळे झाली. या चित्रपटातील प्राजक्ता माळीबरोबरचा तिचा रोमँटिक अंदाज चांगलाच चर्चेचा विषय बनला होता. नुकतंच ऋतुजाने रोमँटिक सीन्स कोणत्या अभिनेत्याकडून शिकली याचा खुलासा केला आहे.
हेही वाचा – “…यासाठी मराठी माणसानं महाराष्ट्र सोडला पाहिजे”; ‘सुभेदार’ फेम अजय पुरकरांचं वक्तव्य, म्हणाले…
ऋतुजचा लवकरच ‘अंकुश’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ती नंदिनी सुर्वेच्या भूमिकेत झळकणार आहे. यानिमित्ताने ‘अल्ट्रा मराठी बज’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी तिनं नुकताच संवाद साधला. यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘पुन्हा एकदा चिन्मय उदगीरकरबरोबर काम करायचा योग ‘अंकुश’ चित्रपटामुळे जुळून आला आहे. तुला त्याच्याबरोबर पुन्हा एकदा काम करताना कसं वाटतं? एक अभिनेता म्हणून तो किती बदला आहे? त्यानं तुला तुझ्यात झालेले बदल काही सांगितले का?’
हेही वाचा – प्रसाद ओकच्या ‘या’ आगामी चित्रपटात झळकणार गौरव मोरे; फिल्टरपाड्याच्या बच्चनने स्वतः केला खुलासा
यावर ऋतुजा म्हणाली, “एकतर म्हणजे तो माझ्या पहिल्या मालिकेचा नायक आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर खास नातं कायम आहे. आधी मला रोमँटिक सीन्स करायला प्रोब्लेम व्हायचा. कारण माझी पहिलीच मालिका होती. त्याच्या आधी मी एकांकिका स्पर्धा करायचे. पण त्याच्यामध्ये रोमँटिक सीन्स नसायचे. त्यामुळे मी बाकी सगळे सीन्स मस्त करायचे. पण रोमँटिक सीन्स करताना थोडीशी गलत व्हायची. मात्र चिन्मयने ते माझ्याकडून करून घेतलं. त्यातली नॅक (कौशल्य) सांगितली. आता मी दगडाबरोबर सुद्धा रोमान्स करू शकते.”