मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती सतत चर्चेत असते. सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. सई सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे. नुकतंच सईने मुंबईत तिचं पहिलं घर घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती तिच्या जुन्या घरातील सामानाचे शिफ्टींग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने मुंबईत घर खरेदी केल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
आणखी वाचा : “मी सई ताम्हणकरची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला, पण…” अमृता खानविलकर स्पष्टच बोलली

सई ताम्हणकरची पोस्ट

“द एलेव्हन्थ प्लेस, पुन्हा घाबरून आणि त्याच उत्साहाने मी नवीन घरात पाऊल ठेवतेय, एक स्वप्न पूर्ण झालंय. माझं पहिलं मुंबईतील घर, एक मैलाचा दगड गाठला. एक असं ठिकाण ज्याला आपण घर म्हणतो. जिथे आठवणी विणल्या जातात.

पण या आनंदादरम्यान एक कडू आठवण. माझं एकेकाळीचं जे घर होतं, त्याच्या ओळखीच्या भिंती आणि जुन्या घराचा निरोप घेतेय. ज्या ठिकाणी मी एकेकाळी आरामात राहिले होते ते सोडतेय.

याच्या प्रत्येक खोलीत आठवणी आहेत. कुजबूज, हास्याचे आणि फुललेल्या क्षणांचे प्रतिध्वनी, भिंतींवर भूतकाळातील कथा आहेत. पण एका नवीन अध्यायाला सुरुवात करत असताना, विनम्र कृतज्ञतेने माझं मन भरून आलंय. या घरातील आठवणी आणि त्यातून अनेक धडे शिकले आहे. पण या नवीन घरात, नवीन स्वप्ने विणली जातील. म्हणूनच मी कृतज्ञ अलिंगन देऊन या घराचा निरोप घेते आणि माझ्या नवीन घरात पाऊल ठेवतेय, एक प्रकाशाचा किरण”, अशा आशयाची पोस्ट सई ताम्हणकरने केली आहे.

आणखी वाचा : “मला अमेय खोपकरांनी फोनवरुन धमकी दिली”, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट, म्हणाले “मी कुशलला…”

दरम्यान सई ताम्हणकरच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेत्री क्षिती जोगने तिला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेक कलाकार हार्ट इमोजी शेअर करताना दिसत आहेत.