मराठीमधील टॉपची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःला कलाक्षेत्रामध्ये सिद्ध केलं. ती मराठी चित्रपटसृष्टीपुरताच मर्यादित राहिली नाही. तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही सई महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते. सई तिच्या कामाबरोबरच फॅशन सेन्समुळेही चर्चेत राहिली आहे. फॅशनबाबत वेगवेगळे प्रयोग करणं तिला आवडतं. आता तिने शेअर केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
सई सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. वेस्टर्न असो वा पारंपरिक स्टाइलचे कपडे परिधान करुन ती सोशल मीडिया अकाऊंटद्वारे फोटो शेअर करताना दिसते. आताही तिने असेच काही फोटो पोस्ट केले आहेत. सईचे हे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – “आज त्याच्याकडे फेम आहे पण…” एमसी स्टॅनच्या वागणुकीवर भडकले पुण्याचे गोल्डन बॉईज, म्हणाले, “गर्व…”
सई वेस्टर्नबरोबरच पारंपरिक लूकमध्येही अगदी उठून दिसते. आताही तिने पारंपरिक लकूमध्ये खास फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये तिने साडी परिधान केलेली दिसत आहे. शिवाय तिचा साजशृंगार विशेष लक्ष वेधून घेणारा आहे. हातात हिरवा चुडा, केसात गजरा, कपाळी टिकली आणि सुंदर साडी असा सईचा लूक आहे.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
सईला या लूकमध्ये पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. सईने हा फोटो शेअर करत म्हटलं की, “सालस”. अप्रतिम सौंदर्य, तू साडीमध्ये अगदी सुंदर दिसते, सई खूप छान, सुंदर, तू पारंपरिक लकूमध्ये लक्ष वेधून घेतेस अशा विविध कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. तर सईने या साडीवर परिधान केलेले दागिनेही अगदी सुंदर आहेत.