अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह बॉलिवूडमध्येही आता स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ सारख्या नावाजलेल्या पुरस्कारांनी सईला सन्मानित करण्यात आलं. आपल्या भूमिकांमुळे तसेच कामामुळे चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य काही कोणापासून लपून राहिलेलं नाही. ती स्वतः आपल्या खासगी आयुष्याबाबत उघडपणे बोलताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या वडिलांबाबत भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सईने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या वडिलांबाबत भाष्य केलं आहे. “वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष, नैराश्य याचा तुझ्या व्यावसायिक आयुष्यावर काही परिणाम होतो का?” असं सईला विचारण्यात आलं. यावेळी सईने वडिलांचा उल्लेख करत एक प्रसंग सगळ्यांबरोबर शेअर केला.

आणखी वाचा – “शेतीच करत राहिलो असतो तर…” ‘सैराट’नंतर तानाजी गालगुंडेने केली पायाची सर्जरी, म्हणाला, “माझे दोन्ही पाय…”

आणखी वाचा – “अपघातात त्यांचं निधन झालं आणि…” नाना पाटेकरांनी सांगितला ‘सिंहासन’ दरम्यानचा ‘तो’ वाईट प्रसंग, म्हणाले, “चित्रपटात मी त्यांना मारलं म्हणून…”

सई म्हणाली, “दोघंही एकमेकांशी निगडीत आहेत. दोन्ही आयुष्याचा एकमेकांवर परिणाम होतो. काही भूमिका वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकावतात. तर वैयक्तिक आयुष्यामधील एखाद्या घटनेचा तुमच्या कामावरही परिणाम होतो. याचविषयी मला एक किस्सा सांगायचा आहे”. सईने काम व वैयक्तिक आयुष्य याचा संमतोल राखणं किती अवघड आहे? याविषयी भाष्य करताना एक भावुक किस्सा सांगितला.

आणखी वाचा – “ड्रग्ज घेतो आणि…” शेखर सुमनच्या मुलाचा बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाला, “वडिलांवरील राग काढण्यासाठी मला…”

ती पुढे म्हणाली, “‘हाय काय नाय काय’ या चित्रपटाचं चित्रीकरण मी करत होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानेच माझ्या वडिलांचं निधन झालं. वडिलांवर मी अंत्यसंस्कार केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी या चित्रपटाच्या सेटवर हजर झाले. विशेष म्हणजे हा चित्रपट विनोदी होता. वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यामध्ये खूप मोठा फरक असतो”. सईने सांगितलेला हा प्रसंग अगदी अंगावर काटा आणणारा होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sai tamhankar talk about her father says when my dad death i am on movie set see details kmd
Show comments