मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. सई सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सईने मुंबईत तिचं पहिलं घर घेतलं आहे. आता तिने तिचा मुंबईत येण्याचा प्रवास कसा झाला, याबद्दल सांगितले आहे.

सई ताम्हणकरने तिच्या युट्यूबवर तिच्या नवीन आणि जुन्या घराचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात तिने नवीन घराची झलक दाखवली आहे. त्याबरोबरच तिने तिचा हा प्रवास कसा झाला, याबद्दलचाही खुलासा केला आहे. यावेळी तिने तिला मुंबईत का आवडते आणि तिने याच ठिकाणी घर का घेतले, याबद्दलही भाष्य केले.
आणखी वाचा : Video : सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर, जुन्या घराला ‘गुडबाय’ करताना म्हणाली “भूतकाळातील…”

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही

“मी मुंबईत राहायला येण्यापूर्वी इथे कायम उन्हाळ्याच्या सुट्टी यायचे. त्यावेळी मला या शहराचा वेग आवडला. मला आजही मुंबईतील धावपळ, त्याचा वेग आवडतो. मी मुंबईत काम करायला लागायच्या आधीपासूनच मला या गोष्टी प्रचंड आवडल्या.

मी जेव्हा मुंबईतून परत सांगलीला गेले, तेव्हा मी माझ्या आईला म्हटलं की मी कधी ना कधी तरी नक्कीच मुंबईत जाणार आणि तिथेच राहणार.

यानंतर आता मला असं वाटतं की मुंबईने मला आणि मी मुंबईला मनापासून निवडलं. त्यानंतर मग मुंबईनेच माझा स्वीकार केला. त्यामुळे माझे मुंबईवर फार प्रेम आहे”, असे सई ताम्हणकर म्हणाली.

आणखी वाचा : “मी सई ताम्हणकरची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला, पण…” अमृता खानविलकर स्पष्टच बोलली

दरम्यान सई ताम्हणकर ही मूळची सांगलीची असली तरी आता ती खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे. नव्या घराबरोबरच तिने नुकतंच तिचं युट्यूब चॅनेल सुद्धा सुरु केलं आहे. सई तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी २००५ मध्ये मुंबईत आली. सांगलीत तिचं संपूर्ण बालपण गेलं. तेव्हापासून सई आई-बाबांच्या, नातेवाईकांच्या आणि भाड्याच्या अशा एकूण १० घरांमध्ये राहिली. त्यामुळे नव्या घराला अभिनेत्रीने ‘माय इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे.