‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ ते ‘मिमी’ आणि ‘भक्षक’पर्यंतचा प्रवास करत सई ताम्हणकरने प्रेक्षकांचं मन जिंकलं. मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लवकरच सई इमरान हाश्मी आणि ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधीबरोबर ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात झळकणार आहे. याव्यतिरिक्त सईने रणवीर सिंहबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा सईला विचारण्यात आलं की, तुला कोणत्या अभिनेत्याबरोबर आणि दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची इच्छा आहे. यावर सई म्हणाली, “रणवीर सिंह, देव पटेल, श्रीराम राघवन, अनुराग कश्यप आणि नागराज मंजुळे.”

रणवीर सिंहच्या बहिणीची भूमिका मिळाली तर चालेल का? असं मुलाखतदाराने विचारताच सई ताम्हणकर “नाही” असं स्पष्टचं म्हणाली. मग वहिनीची भूमिका चालेलं का? असंही अभिनेत्रीला विचारण्यात आलं. यावर सई म्हणाली, “बघा, भूमिका कशी आहे त्यावर अवलंबून आहे. वहिनी किंवा बहिणीची भूमिका असली तरी भूमिकेवर सगळं अवलंबून आहे.”

हेही वाचा… रोहिणी हट्टंगडी यांना मिळालं वाढदिवसाचं खास सरप्राईज! अमेरिकेत विमान प्रवासादरम्यान मिळाल्या शुभेच्छा

‘सौ. शशी देवधर’ हा चित्रपट हिंदीमध्ये रिमेक व्हावा असंही सई या मुलाखतीदरम्यान म्हणाली. आयुष्यभर एकाच अभिनेत्याबरोबर काम करायचं असेल तर तो कोणता अभिनेता असेल? असा प्रश्न विचारताचं सईने ललित प्रभाकरचं नाव घेतलं.

हेही वाचा… लक्ष्मीच्या पावलांनी : नयना आणि राहुल लवकरच अडकणार लग्नबंधनात; अद्वैतच्या निर्णयाला कलाचा पाठिंबा, पाहा प्रोमो

दरम्यान, सईच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सई शेवटची ‘भक्षक’ या चित्रपटात भूमी पेडणेकरबरोबर झळकली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. सई ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाची परीक्षक आहे. लवकरच सई ‘ग्राउंड झिरो’, ‘अग्नी’ या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sai tamhankar wants to work with ranveer singh dvr