मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. संतोष जुवेकरने आतापर्यंत ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. नुकताच त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

संतोष जुवेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याचे काही फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने त्याचा वाढदिवस कसा साजरा झाला, याबद्दलची माहिती दिली आहे.
आणखी वाचा : …यामुळे प्रसाद जवादे व अमृता देशमुखमध्ये झालं होतं पहिलं भांडणं, अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाली…

संतोष जुवेकरची पोस्ट

“Thank u आणि love u सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी मला आज wish करून मेरा दिन बना डाला. ह्यावेळेला shooting मुळे बाहेर आहे so missing घरचे आणि मधुरा-पिल्लू आपली party मेरेपे उधार.

वाढदिवसाच्या दिवशी माझं आवडतं काम करायला मिळणं आणि मग packup नंतर आजची संध्याकाळ फक्त मी आणि माझा वाढदिवस. cheeerrssss”, असे संतोष जुवेकरने म्हटले.

आणखी वाचा : कुंकवाचा टिळा, दाढी-मिशी अन्…; ‘धर्मवीर २’ मध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा पहिला लूक समोर

दरम्यान संतोष जुवेकरच्या या पोस्टवर संगीतकार अवधूत गुप्तेने कमेंट केली आहे. अवधूत गुप्तेने संतोषला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबरच त्याने हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. तसेच अनेक चाहतेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

Story img Loader