अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने ‘सैराट’मध्ये आर्ची ही भूमिका साकारली आणि त्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. पहिल्याच चित्रपटातून ती स्टार झाली. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आजही प्रेक्षकांमध्ये तिची क्रेझ आहे. ती कलाविश्वात जितकी सक्रीय आहे. तितकीच सोशल मीडियावरदेखील आहे. विविध पोस्ट्सच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिच्या एका व्हिडीओची चाहत्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही भुरळ पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिंकूने नुकतंच गुलाबी रंगाच्या साडीत एक फोटोशूट केलं. त्या फोटोशूटमधील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर या साडीतील एक व्हिडीओही तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. या व्हिडीओत ती फ्रेश लूकमध्ये दिसत असून ओंजळीत सुंदर फुलं घेऊन तिने ती स्वतःच्या अंगावर उडवली.

आणखी वाचा : “मी ज्यांना प्रपोज केलं त्यांनी…”; सायली संजीवचा प्रेमाबद्दल मोठा खुलासा

हा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्याच्यावर लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे तर मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सायली संजीव हिलाही हा व्हिडीओ प्रचंड आवडला आणि या व्हिडीओवर तिने लाल रंगाचा हार्ट इमोजी देत प्रतिक्रिया दिली. तिने कमेंट करत लाल रंगाचे दोन हार्ट इमोजी दिले. तर रिंकूनेही याला रिप्लाय देत सायलीचे आभार मानले.

हेही वाचा : Video: ‘सैराट’ चित्रपटाचा विक्रम मोडणाऱ्या ‘वेड’ची आर्चीला भुरळ, रिंकू राजगुरूचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

आता रिंकूचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला असून तिच्यात आणि सायली संजीवमध्ये असलेलं बॉण्डिंगही चाहत्यांना आवडलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sayali sanjeev comments on rinku rajguru new post on instagram rnv