मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम काम करत अभिनेत्री सायली संजीवने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठी चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका खरंच उल्लेखनीय आहेत. कलाक्षेत्राबरोबरच सायलीला राजकीय क्षेत्राचीही आवड आहे. तिची काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली होती. आता सायलीने राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याबाबत भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सायलीला राजकीय टिपणी केल्यानंतर तुला ट्रोल केलं जातं. याकडे तू कशी पाहते? असं विचारण्यात आलं. यावर सायली म्हणाली, “आता मी एका पक्षामध्ये आहे. त्या पक्षाच्या मी पदावर आहे. तर अर्थातच त्या पक्षाची बाजू मी मांडणार. मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाची बाजू मांडताना जर माझ्यावर टीका होत असेल तर ते मी स्वीकारते. ही टीका स्वीकारणं गरजेचंच आहे. संबंधित पक्षाची विचारधारा पुढे नेण्यासाठी तुम्हाला विचार मांडावे लागतात. त्यामुळे टीका होत असली तरी त्याचा मला फरक पडत नाही”.

आणखी वाचा – CSKच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाडवरुन कमेंट करणाऱ्यांना सायली संजीवचं उत्तर, म्हणाली, “त्याचं जेव्हा लग्न होईल तेव्हा…”

आणखी वाचा – “शेतीच करत राहिलो असतो तर…” ‘सैराट’नंतर तानाजी गालगुंडेने केली पायाची सर्जरी, म्हणाला, “माझे दोन्ही पाय…”

“मी त्या पक्षात आहे तर मी त्याचीच बाजू मांडणार. दुसऱ्या पक्षाचं एखादं काम आवडलं तर तेही मी सांगणार. पण बाजू मांडताना मी माझ्या पक्षाची मांडणार हे इतकं साधं गणित आहे. जे महाराष्ट्र, देशासाठी चांगले आहेत त्यांना चांगलं म्हणण्याचीही आपल्यामध्ये वृत्ती असावी. मीही ते फॉलो करते. पण त्यावरही टीका होते त्यासाठी धन्यवाद. कारण टीका करणारे एवढा वेळ माझ्यासाठी देत आहेत, माझ्याबाबत बोलत आहेत याचा मला आनंद आहे”.

आणखी वाचा – “तुझ्यापेक्षा जिनिलीया…” विलासराव देशमुख यांना होतं सूनेचं कौतुक, रितेश देशमुखने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “आज ते असते तर…”

“भविष्यात नाशिकचा नगरसेवक, आमदार, खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का?” असाही प्रश्न सायलीला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, “माहीत नाही. असेलही. कारण नक्कीच मला काम करायला आवडेल”. सायली ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाबरोबर तिला यापुढेही नगरसेवक, आमदार, खासदार या पदासाठी काम करायची इच्छा आहे हे दिसून आलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sayali sanjeev in mns wants to became a mla in future says i want to do work see details kmd