कलाकार मंडळी आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करतात. शिवाय इतर क्षेत्रांमध्येही काम करण्यामध्ये काही कलाकारांना अधिक रस असतो. काही कलाकार सामाजिकरित्या अधिक काम करतात. तर काही राजकारणात प्रवेश करत उत्तम काम करण्याचा प्रयत्न करतात. मराठीमधीलही काही कलाकारांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.

सायलीला राजकीय क्षेत्राची आवड आहे. तिची काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली होती. शिवाय नुकतंच ‘मुंबई तक बैठक’ या कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने राजकीय क्षेत्रात काम करण्याबाबत भाष्य केलं. तसेच या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेही उपस्थित होत्या.

आणखी वाचा – CSKच्या विजयानंतर ऋतुराज गायकवाडवरुन कमेंट करणाऱ्यांना सायली संजीवचं उत्तर, म्हणाली, “त्याचं जेव्हा लग्न होईल तेव्हा…”

सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये सायलीने त्यांचं कौतुक केलं. तसंच सुषमा अंधारे यांची भाषण करण्याची पद्धतही सायलीला आवडते. ती म्हणाली, “सुषमा ताई तुम्ही जे काही बोलता ते मला खूप आवडतं. तुमचे खूप खूप धन्यवाद. मला हे काही वेळापूर्वीच बोलायचं होतं. पण राहून गेलं”. सायलीने केलेल्या कौतुकानंतर सुषमा अंधारे यांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटलं.

आणखी वाचा – नाशिकची भावी आमदार, खासदार होण्यास सायली संजीव तयार? राजकारणाबद्दल म्हणाली, “मला…”

या मुलाखतीदरम्यान राजकीय क्षेत्रात काम करण्याबाबत सायलीला प्रश्न विचारण्यात आला. “भविष्यात नाशिकचा नगरसेवक, आमदार, खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का?” असा प्रश्न सायलीला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, “माहीत नाही. असेलही. कारण नक्कीच मला काम करायला आवडेल”. सायली राजकारणामध्ये अधिकाधिक सक्रीय होणार का? हे पाहावं लागेल.

Story img Loader