Marathi Actress Shared Childhood Photo: मराठी कलाकार बरेचदा त्यांच्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. आता असाच एक फोटो लोकप्रिय मराठी अभिनेत्रीन शेअर केला आहे. तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटोत तिला पाहून चाहतेही ओळखू शकलेले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सैराट’मधील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) वडील महादेव राजगुरू यांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये दोन फोटो पोस्ट केले आहे. यातला पहिला फोटो रिंकू अगदी लहान असतानाचा आहे. तिचे बाबा तिला कडेवर घेऊन उभे आहेत. हा फोटो पोस्ट करत तिने ‘बेस्ट बाबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा’ असं लिहिलं आहे.

हेही वाचा – ‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “भावाने मार्केट जाम केलंय”

रिंकू राजगुरूची पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

रिंकूने आई व बाबाबरोबरचा दुसरा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने ‘तुमच्यावर तुमच्या बाबाइतकं परफेक्ट प्रेम कोणीच करू शकत नाही,’ असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोत रिंकू व तिचे आई-वडील पारंपरिक पोषाखात दिसत आहेत.

हेही वाचा – Video: बहिणीला मुलगी झाली समजताच तितीक्षा तावडे झाली भावुक; भाचीचा पहिला फोटो पाहिल्यानंतर काय म्हणाली? जाणून घ्या…

रिंकू राजगुरूची पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

रिंकूचे वडील काय करतात?

रिंकूचे खरे नाव प्रेरणा महादेव राजगुरु असून तिचा जन्म ३ जून २००१ रोजी अकलूज येथे झाला. रिंकूचे वडील महादेव राजगुरू सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज या शाळेत शिक्षक आहेत. रिंकूला सख्खा लहान भाऊ असून त्यांचे नाव सिद्धार्थ राजगुरू असे आहे.

हेही वाचा – Photos: ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूच्या वडिलांना पाहिलंत का? ‘या’ ठिकाणी करतात नोकरी

सैराट चित्रपटातून पदार्पण

रिंकू सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या आई-वडिलांबरोबरचे तसेच भावाबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. रिंकूने ‘सैराट’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘सैराट’ हा मराठीतील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. हा चित्रपट फक्त मराठीच नाही तर इतर भाषिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. ऑनर किलिंगसारख्या विषयावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं होतं. सैराटमध्ये रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अवघ्या चार कोटींचं बजेच असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. ‘सैराट’ चित्रपटाने भारतात १०४ कोटी रुपये कमावले होते. जगभरात या चित्रपटाने ११० कोटी रुपयांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress shared childhood photo with father sairat fame rinku rajguru hrc