मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, अनुजा साठे, सौरभ गोखले, क्षिती जोग, अमेय वाघ, जितेंद्र जोशी, शशांक केतकर, वैदेही परशुरामी अशा बऱ्याच मराठी कलाकारांनी हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे आजकाल हिंदी चित्रपट, वेब सीरिजमध्ये मराठी कलाकार पाहायला मिळत आहेत. लवकरच निर्मिती क्षेत्रात सध्या आघाडीवर नाव असणारी मराठी अभिनेत्री हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.

या मराठी अभिनेत्रीने गेल्या वर्षी एका लोकप्रिय मालिकेची निर्मिती करत निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर आता लवकरच तिची पहिली निर्मिती असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शिवाय तिची निर्मिती असलेली आणखी एक मालिका लवकरच सुरू होणार आहे. आता यावरून ओळखचं असेल ही मराठी अभिनेत्री कोण आहे?

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

हेही वाचा – हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाच्या कलेक्शनध्ये मोठी वाढ, शनिवारी केली जबरदस्त कमाई

निर्मिती क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी ही मराठी अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही शर्मिष्ठाची पहिली निर्मिती असलेली मालिका आहे. ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. त्यामुळे या मालिकेच्या यशानंतर शर्मिष्ठाची दुसरी निर्मिती असलेली मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अलीकडेच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला. ज्यामध्ये अभिनेता राकेश बापट प्रमुख भूमिकेत झळकला. या मालिकेसह शर्मिष्ठाची निर्मिती असलेला पहिला चित्रपट ‘नाच गं घुमा’चं सध्या चित्रीकरण सुरू आहे. अशातच शर्मिष्ठा हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.

शर्मिष्ठाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री ‘रायसिंघानिया वर्सेज रायसिंघानिया’ या हिंदी वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. १२ फेब्रुवारीला ही वेब सीरिज ‘सोनी लिव्ह’वर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये शर्मिष्ठा कुठल्या भूमिकेत झळकणार आहे? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा – “माझं दिसणं, बोलणं, रंग, उंची…”, जुई गडकरीने सांगितला इंडस्ट्रीमधील अनुभव; बॉडी शेमिंगचा उल्लेख करत म्हणाली…

दरम्यान, ‘रायसिंघानिया वर्सेज रायसिंघानिया’ या कोर्ट ड्रामा सीरिजमध्ये अभिनेत्री जेनिफर विंगेट, करण वाही, रीम शेख, संजय नाथ असे तगडे कलाकार मंडळी आहेत. या सीरिजचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता.

Story img Loader