Shivani Surve Movie: लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ असे या चित्रपटाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी या मराठी सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आता ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यातील अॅक्शन सीन्स, कलाकारांची झलक व प्रभावी बॅकग्राऊंड म्युझिकमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
टीझरमध्ये शिवानी सुर्वे, विराट मडके यांच्या अप्रतिम अभिनयाची झलक पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये म्युझिक उत्कंठावर्धक आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे या चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहे. टीझर पाहिल्यावर चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमात मराठीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार शिवानी सुर्वे, विराट मडके, प्रसाद खांडेकर, अश्विनी चावरे, शलाका पवार यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याचबरोबर, साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार कवीश शेट्टी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीतील प्रतिभावंत कलाकार एकाच सिनेमात एकत्र येणार आहेत.
सत्य घटनांवर आधारित ‘या’ १२ सुपरहिट भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का? OTT वर आहेत उपलब्ध
‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमाचे निर्माते दिपक पांडुरंग राणे हे विविध जॉनरमधील सिनेमांची निर्मिती करत प्रेक्षकांना खास अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतात. दाक्षिणात्य कलाकारांसह मराठी कलाकारांच्या भूमिका असलेला हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
“विराट कोहली उत्तम अभिनेता, पण त्याने चित्रपटांमध्ये येऊ नये; निवृत्तीनंतरही नाही”
हा सिनेमा कन्नडा, मराठी, हिंदी, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम या ६ भाषांमध्ये पॅन इंडिया रिलीज होणार आहे.