मराठी सिनेसृ्ष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत अभिनेत्री शिवानी सुर्वे हे नाव कायमच आघाडीवर असतं. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सिझन २ मुळे ती चर्चेत आली होती. शिवानी सुर्वेने नुकतंच चित्रपट आणि मालिकांमधील फरक सांगितला आहे.
शिवानी सुर्वेने नुकतंच ‘महाराष्ट्र टाईम्स’ या वृ्त्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी तिने चित्रपटसृष्टी, मालिका विश्व याबद्दल थेट भाष्य केले. त्याबरोबरच तिने वाळवी चित्रपटाच्या यशाबद्दलही सांगितले.
आणखी वाचा : “तुला गमावणं ही सर्वात कठीण गोष्ट”, अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे निधन; म्हणाली “तुझे हृदय…”
‘वाळवी’ चित्रपटात काम केल्यानंतर तुझा अनुभव कसा होता? असा प्रश्न यावेळी शिवानीला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, “हा चित्रपट आम्ही आधीच शूट केला होता. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे ज्या पद्धतीने स्वागत झाले, ते फारच प्रोत्साहन देणार होतं.”
“या चित्रपटानंतर मला अनेक मेसेज आणि फोन आले. या चित्रपटाच्या यशामुळे सर्व गणितंच बदलली. त्यानंतर मला कुणाला उत्तर द्यायला जावं लागलं नाही. सुंदर आहे म्हणून बुद्धिमत्ता नसेल, असा लोकांचा समज असतो, पण या अशा मतांनी काही फरक पडत नाही. बोलणारे बोलतात, आपण कामातूनच बोलायचं आणि प्रवास सुरू ठेवायचा, असं मला वाटतं”, असे शिवानी सुर्वेने म्हटले.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” प्रार्थना बेहेरेबरोबर अफेअरच्या चर्चांवर वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य
“तसेच मालिकेत काम करणाऱ्या अनेक कलाकारांना चित्रपटाची संधी मिळायला वेळ लागतो. माझ्या बाबतीतही तसंच झालं. मराठी-हिंदी मालिकांत व्यग्र असल्यामुळं मला तेव्हा चित्रपटांसाठी वेळ काढणंही अवघड होतं. हे काम सातत्यानं सुरू होतं. पण आता मी मोठ्या पडद्यावरही काम करायचं ठरवलं आहे”, असेही शिवानीने सांगितले.