‘राधा ही बावरी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या अभिनयाबरोबर सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. श्रुतीने मालिका, चित्रपट, वेब सीरिज या तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनय कौशल्याने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिने मराठीबरोबर, तमिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये काम केलं आहे. शिवाय श्रुतीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केल्याचं सर्वश्रृत आहे. अलीकडेच बंद झालेली ‘नवा गडी नवं राज्य’ या लोकप्रिय मालिकेची ती निर्माती होती. अशी सर्वगुण संपन्न असलेली ही अभिनेत्री सध्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. “आयुष्याचं छान वर्तुळ पूर्ण करण्यासाठी पुरुषाची गरज नसते,” असं तिने वक्तव्य केलं आहे. पण श्रुती असं का म्हणाली? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आरपार’ या युट्यूब चॅनेलच्या ‘वूमन की बात’ या कार्यक्रमात अभिनेत्री श्रुती मराठे सहभागी झाली होती. तेव्हा तिला विचारण्यात आलं की, खऱ्या आयुष्यात स्त्री म्हणून श्रुती मराठेला काय वाटतं की, एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये एखादा पुरुष यावा लागतो तेव्हाच त्याचं आयुष्य कलरफुल होईल? या प्रश्नाचं उत्तर देत श्रुती म्हणाली, “मला वैयक्तिक असं वाटत नाही. म्हणजे तो काय उद्देशाने तुमच्या आयुष्यात येतोय, याचाबद्दल तुम्ही खूप क्लिअर असायला लागतं. मला असं वाटतं, तुमच्याशिवाय इतर कोणीही तुम्हाला पूर्ण करू शकत नाही.”

हेही वाचा – Video: ‘या’ अभिनेत्रीने वडिलांच्या आजारपणामुळे सोडली लोकप्रिय मालिका, भावुक व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

पुढे श्रुती म्हणाली, “कोणीतरी तुमचं आयुष्य असं छान वर्तुळामध्ये पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुरुषाची गरज नसते. मला जर एका पुरुषाची गरज किंवा लग्न करावसं वाटलं की एक नवरा माझ्या आयुष्यात मला हवासा वाटला. तर एक सोबती म्हणून हवाय. मला त्याची गरज आहे किंवा त्यांनी माझं आयुष्य पूर्ण करावं म्हणू नको. पण त्याने माझी साथ द्यावी, मी त्याची साथ द्यावी म्हणून मला हवाय. “

हेही वाचा – Video: धकधक गर्ल माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेंसह सिद्धिविनायकाच्या चरणी, निमित्त होतं खास…

दरम्यान, श्रुती मराठेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘राधा ही बावरी’ या व्यतिरिक्त ‘जागो मोहन प्यारे’ या लोकप्रिय मालिकेतही काम केलं आहे. तसेच ‘सनई चौघडे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘शुभ लग्न सावधान’ यांसारख्या चित्रपटातही तिने काम केलं आहे. शिवाय श्रुती इमरान हाशमीच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ सीरिजमध्येही झळकली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress shruti marrathe says a man is not needed to complete the beautiful circle of life pps