Shubhangi Gokhale : मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवलेल्या अभिनेत्री शुभांगी गोखले घराघरांत लोकप्रिय आहेत. सध्या त्या ‘घरत गणपती’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकत्याच ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल आपलं परखड मत मांडलं आहे. शुभांगी गोखले नेमकं काय म्हणाल्या जाणून घेऊयात…

गणेशोत्सवाबद्दल सांगताना शुभांगी गोखले ( Shubhangi Gokhale ) म्हणाल्या, “मी मूळची मराठवाड्याची असल्याने गणेशोत्सवाच्या माझ्या अशा फारशा आठवणी नाही आहेत. पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी गणपती असतो आणि मुंबईत अलीकडे बाहेरून आलेली माणसं सुद्धा गणपती बसवतात. नेपाळ, युपीवरून आलेले लोक सुद्धा गणेशोत्सव साजरा करतात. पण, खरा गणपती हा कोकणातला आहे.”

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

हेही वाचा : ‘गुलाबी साडी’ गाणं का लिहिलं? संजू राठोडने सांगितलं खास कनेक्शन! फक्त एका तासात रचली चाल

सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल शुभांगी गोखले काय म्हणाल्या?

शुभांगी गोखले पुढे म्हणाल्या, “मी गणेशोत्सवात पुण्यातल्या पाच गणपतींचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर मी मुंबईतला गणेशोत्सव सुद्धा पाहिला आहे. पण, सार्वजनिक गणपतीबद्दल सांगायचं झालं तर, गणेशोत्सवाचं जे काही अवडंबर झालं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. याशिवाय अनेक चुकीच्या गोष्टी घडतात. सार्वजनिक गणपती आपण मोठ्या भक्तिभावाने करतो पण, मला असं वाटतं आता आपण सार्वजनिक गणपती नाही केले पाहिजेत. रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही गणेशोत्सव साजरा करता… पण, त्यानंतर रात्री तुम्ही दारू पिऊन पत्ते खेळणं वगैरे चालतं आणि हे कोणीच अमान्य करू शकत नाही. हे एकदम चुकीचं आहे… हे अजिबातच चांगलं नाहीये.”

“या सगळ्या गोष्टी करून तुम्ही तुमच्याच देवाचा अपमान करता. त्यामुळे आता हे बंद केलं पाहिजे. छोट्या- छोट्या गावांमध्ये आता सुबुद्धपणे एक गाव एक गणपती अशी प्रथा सुरू केली आहे. त्यामुळे आपण आता असे बदल केले पाहिजेत. कारण, सार्वजनिक गणेशोत्सवात प्रदूषण होतं…एनर्जी वाया जाते. मला वाटतं घरोघरी जो गणपती बसतो तो खूपच सुंदर असतो.” असं स्पष्ट मत शुभांगी गोखले यांनी मांडलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरात लोकप्रिय गायक व ‘परदेसी गर्ल’ची एन्ट्री! कोण आहेत ‘हे’ स्पर्धक? पहिलाच प्रोमो चर्चेत

shubhangi gokhale
मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले ( Shubhangi Gokhale )

दरम्यान, ‘घरत गणपती’ हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले ( Shubhangi Gokhale ), डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशीष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशा नामवंत कलाकारांची मांदियाळी आहे.