अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती चालू घडामोडींविषयी परखड मत व्यक्त करत असते. शिवाय ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देखील देत असते. सध्या सोनालीचे बालीचे फोटो आणि व्हिडीओ खूप चर्चेत आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही दिवसांपासून सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बालीच्या ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. व्हिडीओमधून सोनाली बालीमधील हिंदू संस्कृतीविषयी चाहत्यांना माहिती देताना दिसत आहे. तसेच बालीच्या सुंदर निर्सगातील तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. पण यामधील एका पोस्टवर एका नेटकऱ्याने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ज्याला सोनालीने चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – Video: वर्षाच्या अखेरीस प्रसाद ओकची नवी सुरुवात, व्हिडीओ शेअर करत दिली आनंदाची बातमी

सोनालीच्या एका पोस्टवर पूनम पाटील पांडव नावाच्या युजरने प्रतिक्रिया देत लिहिलं की, बिचारा नवरा एकही फोटो नाही त्याचा. या युजरला सडेतोड उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, “त्याची मर्जी, तुम्हाला का त्रास होतोय एवढा?” याआधीही सोनालीला तिच्या बऱ्याच पोस्टवर नवऱ्याविषयी विचारलं गेलं होतं. तेव्हा देखील अभिनेत्रीने युजर्सना चांगलंच उत्तर दिलं होतं.

हेही वाचा – Video: ‘पारू’, ‘शिवा’नंतर ‘झी मराठी’ने आणखी एका मालिकेची केली घोषणा, प्रोमो आला समोर

दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच मल्याळम चित्रपटात झळकणार आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहनलालसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. ‘मलाइकोट्टई वालीबान’ असं सोनालीच्या मल्याळम चित्रपटाचं नाव असून पहिल्यांदाच ती दाक्षिणात्य चिपटात काम करणार आहे.