मराठी कलाविश्वाची ‘अप्सरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिवाळीच्या मुहूर्तावर तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोनालीने दुबईत आलिशान नवीन घर खरेदी केलं आहे. अभिनेत्रीचा नवरा कुणाल बेनोडेकर दुबईला असतो त्यामुळे दोघांनी मिळून परदेशात सुंदर घर घेतलं आहे. सध्या सोनालीच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर केलेल्या फोटोंना “पाडवा in the new होम” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे मुंबईत होती. परंतु, गृहप्रवेशाच्या निमित्ताने तिने यंदाची दिवाळी नवऱ्याबरोबर दुबईत साजरी केली आहे.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”
dubai visa policy
दुबईचा व्हिसा मिळवताना भारतीय पर्यटकांना अडचणी का येत आहेत? काय आहेत नवे नियम?
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Green chillies from Vidarbha, Green chillies,
विदर्भातील हिरवी मिरची थेट दुबईच्या बाजारात

हेही वाचा : आलिया भट्ट-रणबीर कपूरमध्ये ‘या’ गोष्टीवरून होतात भांडणं; करीना कपूर सल्ला देत म्हणाली, “दुसऱ्या बाळाची…”

सोनालीच्या नवीन घरातील सुंदर व्ह्यू आणि दारावरच्या हटके नेमप्लेटने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनाली व कुणालच्या नवीन घराच्या नेमप्लेटवर दोघांची टोपणनावं लिहिण्यात आली आहेत. अभिनेत्रीला सगळेजण प्रेमाने सोना, तर तिचा नवरा कुणाल बेनोडेकरला सगळे प्रेमाने केनो म्हणतात. यानुसार या दोघांनी नव्या घरातील नेमप्लेटवर #केनोसोना (#KenoSona) असं लिहून घेतलं आहे.

हेही वाचा : नाना पाटेकरांनी सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याच्या डोक्यावर जोरात मारला फटका, व्हिडीओ व्हायरल

दारावरच्या या नेमप्लेटजवळ सोनालीने नवऱ्याबरोबर सुंदर फोटोशूट केलं आहे. सध्या अभिनेत्रीवर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ऐतिहासिक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Story img Loader