बॉलीवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ या आगामी चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाण्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक करण औजलाने गायलेलं ‘तौबा-तौबा’ गाणं प्रदर्शित झाल्यापासून युट्यूब ट्रेंडिंगमध्ये नंबर वनवर आहे. या गाण्याला आतापर्यंत ३१ मिलिहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे ‘तौबा-तौबा’ या गाण्यात विकी कौशलने केलेल्या हूकस्टेप सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रत्येकजण विकीने केलेली हूकस्टेप करताना दिसत आहे. अशातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी विकी कौशलच्या या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळाली. सोनालीने हा डान्स व्हिडीओ नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

“मला हा एक ट्रेंड करायचा होता. विकी कौशल तू रॉक आहेस आणि कसा?”, असं कॅप्शन लिहित सोनाली कुलकर्णीने ‘तौबा-तौबा’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, सोनाली मेस्सीची जर्सी आणि दोन वेण्यांमध्ये विकी कौशलच्या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहे. लंडनमध्ये तिने हा डान्स केला आहे. इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी तिच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Lakhat Ek Amcha Dada actors dance video
Video : झापुक झुपूक…! ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा जबरदस्त डान्स; सर्वत्र होतंय कौतुक

हेही वाचा – Video: “औक्षवंत हो…”, ऐश्वर्या नारकर यांनी पती अविनाश नारकरांचा ‘असा’ साजरा केला वाढदिवस, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

“कुलकर्णींना जमत नाही असं होईल का?”, “कडक”, “तू ट्रेंड जिंकली आहे”, “वाह क्या बात है”, “जबरदस्त”, “भारी”, “एक नंबर”, अशा प्रतिक्रिया सोनाली कुलकर्णीच्या डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या आहेत. याआधीही सोनालीने ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरला आईने नव्हे तर सासऱ्यांनी शिकवला स्वयंपाक, म्हणाली…

दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर याचवर्षी सोनालीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली. २५ जानेवारीला सोनालीचा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं. आता लवकरच ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सोनाली स्वराज्य सौदामिनी छत्रपती ताराराणी या मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Story img Loader