मोहनलाल अभिनीत ‘मलाइकोट्टई वलीबन’ या चित्रपटातून मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हा चित्रपट आज २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. परंतु, मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिचं मल्याळम सिनेमाशी जुनं नातं आहे.
असंख्य मल्याळम सिनेमा पाहिलेल्या या अप्सरेचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी जुनं नातं आहे. मल्याळम चित्रपट ‘शटर’ (२०१२) आणि ‘क्लासमेट्स’ (२००६) या चित्रपटांचे जेव्हा मराठीत रिमेक करण्यात आले, तेव्हा सोनालीनेच यात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या दोन्ही चित्रपटांतील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. त्यामुळे तिचं मल्याळम चित्रपटांबरोबरचं नातं अधिक घट्ट झालं.
हेही वाचा… हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाच्या ट्रेलरची शाहरुख खानला भुरळ; म्हणाला, “खलनायकाचा लूक अन्…”
सोनाली म्हणाली, जेव्हा तिने या चित्रपटाच्या भूमिकेसाठी होकार दिला, त्यावेळी ‘मलाइकोट्टई वलीबन’ चित्रपट संकल्पनेच्याही पलीकडचा बनेल याचा तिला अंदाजही नव्हता. मराठी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये भरपूर साम्य आहे. तसेच दोघांचे प्रेक्षकदेखील समान आहेत. आपल्या संस्कृतीतील कला, साहित्य, भावना यांची ओळख करून देणारे चित्रपट या दोन्ही सिनेसृष्टीत बनवले जातात. वास्तवावर आधारित आणि जागतिक समस्यांवर केंद्रित तसेच सर्वांना जोडणारे, अतिशय जवळचे वाटणारे अशी ओळख या दोन्ही सिनेसृष्टींची आहे.
हेही वाचा… विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ आता ओटीटीवर; कधी, कुठे, कसा, जाणून घ्या…
एलजेपीचे ‘जल्लीकट्टू’ (२०१९) आणि ‘अंगमली डायरीज’ (२०१७) हे चित्रपट मी पाहिले होते, ते खूप उत्तमरित्या बनवले होते. अशी उत्तम कलाकृती साकारणारा एलजेपी मला त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये कास्ट करू इच्छित आहे, हे समजल्यावर मी कल्पनाही केली नव्हती की, ‘मलाइकोट्टई वलीबन’ हा चित्रपट एक भव्य सिनेमॅटिक अनुभव असेल. पुढे ती इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना म्हणाली, “मल्याळम चित्रपटसृष्टीत हा चित्रपट एक उत्कृष्ट रचना आहे.”
‘मलाइकोट्टई वलीबन’ भारतीय संस्कृतीचा उत्सव
“हा खरा अखिल भारतीय चित्रपट आहे, जो देशभरातील विविध संस्कृती दर्शवतो. देशभरातील विविध प्रदेशांत चित्रित होण्यापलीकडे, चित्रपटात भारताच्या विविध भागांतील पात्रे आणि कलाकारही आहेत. मी महाराष्ट्रातून आहे, तर बंगालमधील अभिनेत्री कथा नंदी आणि कर्नाटकातील दानिश सैत या चित्रपटात कार्यरत आहेत. परिणामी, प्रत्येकाने आपले अद्वितीय सांस्कृतिक घटक या चित्रपटासाठी वापरले आहेत. यात मी लावणी हे पारंपरिक मराठी लोकनृत्यही सादर केले आहे. म्हणूनच मला विश्वास आहे की, हा चित्रपट भारतीय संस्कृतीचा सर्वात भव्य स्तरावरचा खरा उत्सव आहे.”
सोनालीची भूमिका नक्की काय?
सोनालीच्या म्हणण्यानुसार, तिची व्यक्तिरेखा, रंगपट्टिनम रंगाराणी ही एक कलाकार, एक नृत्यांगना आणि एक अभिनेत्री अशी आहे, जी थिएटरमध्ये काम करते. ती उत्साही, कणखर आणि ग्लॅमरसदेखील आहे. पुढे सोनाली म्हणाली की, “२०१० च्या मराठी चित्रपट ‘नटरंग’मधील ‘अप्सरा आली’ या लावणी नृत्याने आणि तिच्या अभिनयाने लिजोचं लक्ष वेधलं.” त्यानंतर इतक्या वर्षांनी त्याने सोनालीला चित्रपटाची ऑफर दिली आणि त्यांनी या सिनेमात एकत्र काम केलं.