ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. नुकतंच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने याबद्दल एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतमधील त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी त्यांचं जीवन संपवलं. त्यानंर आता ज्येष्ठ साहित्यिक व कवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य विश्वात पोकळी निर्माण झाली आहे. सोनाली कुलकर्णीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने अजिंठा चित्रपटावेळीचा एक फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : शिंदेशाहीतला एक तारा निखळला, आनंद शिंदेंच्या पुतण्याचं निधन

सोनाली कुलकर्णीची पोस्ट

कालच्या धक्क्यातून अजून सावरतां आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली… नितीन देसाईंनंतर…ना.धो.महानोर….. असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा…!

माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला असे नितीन देसाई आणि या महाकाव्याचे जनक ना.धों. महानोर आज आपल्यात नाही, पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर रहातील, आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की.

नितीन चंद्रकांत देसाई यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं. त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच…

पद्मश्री ना.धो.महानोर यांना अजिंठा या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं “अजिंठा” नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं

रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या.. घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धो. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस. “जैत रे जैत” ते “अजिंठा” ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील.. भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट सोनाली कुलकर्णीने केली आहे.

आणखी वाचा : “मराठी पाऊल पडते पुढे’चा सेट, रस्सीच्या मदतीने बनवलेला धनुष्यबाण अन्…”, नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर कर्मचाऱ्याने केला धक्कादायक खुलासा

दरम्यान ना. धों. महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्र लोकप्रिय ठरले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sonalee kulkarni share emotional post na dho mahanor nitin desai passed away nrp