Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. मराठी, हिंदी यांसह सिनसृष्टीतील अनेक कलाकारही यावर व्यक्त होताना दिसत आहे. नुकतंच या प्रकरणावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने संताप व्यक्त केला आहे. तिने याबद्दल एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

सोनाली कुलकर्णीने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मणिपूरमध्ये झालेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आणखी वाचा : “त्यांनी वडा खाल्ला आणि…” ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला…

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?

सोनाली कुलकर्णीची पोस्ट

“माझी मुलगी ११ वर्षाची आहे.. तिला सध्या सुट्टी आहे.. सुट्टीत तिच्यासाठी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आम्ही प्लॅन करतअसतो.. त्यातली एक गंमत म्हणजे रोज वर्तमानपत्रातल्या ३-४ बातम्या तिने वाचायच्या..कला, क्रीडा, समाज, राजकारण, विज्ञान, विश्व, माणसं.. ह्याबाबत कितीतरी गोष्टी तिच्या कानावर पडतात, तिलासांगण्याच्या निमित्ताने आमची माहिती, स्मृती ताजी होते.. किती मजेत जाते सकाळ..

पण गेल्या आठवड्यापासून माझा थरकाप उडाला आहे.. मी आणि नचिकेत कावेरीपासून पेपर लपवतो आहोत.. एका लहान निरागस मुलीला आपल्या देशातली ही बातमी कुठल्या तोंडानं सांगू आम्ही..? की एका मोठ्या जमावाने दोन स्रियांना विवस्त्र करून हुल्लडबाजी करत, त्यांच्या शरिराला निंदनीय स्पर्श करत त्यांची धिंड काढली.. हा विकृत खेळ दिवसाढवळ्या झाला.. त्या असहाय्य स्त्रिया बचावासाठी पळत असताना कुठलाही समर्थ जबाबदार पुरूष त्यांना वाचवायला पुढे आला नाही..

स्त्रीवर परिस्थितीचा, इतिहासाचा सूड उगवू शकतो हे कोणी ठरवलं.. कोणी ठरवलं की स्त्री एक साधन आहे – तिचा आपण हवा तसा उपयोग करू शकतो.. तीव्र संताप येतोय तेचतेच लिहिण्याचा.. १० सेकंद एक व्हिडीओ पाहू शकले मी .. त्यात काहींनी त्या बायांना केलेले अक्षम्य क्रूर अश्लील स्पर्श दिसले.. त्यात त्या पुरूषांची जात दिसली – त्या जातीचं नाव होतं नराधम ! साधा चुकून पाय लागला कोणाला तर चटकन नमस्कार करतो आपण.. परस्त्रीला मातेसमान मानतो आपण.. भारतीय संस्कार किती महान असतात म्हणतो आपण.. मग..? हे आहेत आपले संस्कार..? अब्रूचे धिंडवडे काढायला शिकवणारे..? बलात्कार झाल्यानंतर हौतात्म्य आणि सहानुभूती देणाऱे..?

आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहेत, मंगळावर यान पाठवणाऱ्या प्रामुख्यानं महिला शास्त्रज्ञ आहेत- ह्यासाठी अभिमान वाटून घेत असताना हे काय घडून बसलं.. सरकार, पोलीस, पत्रकार, समाजसेवक, न्यायव्यवस्था त्यांचं कर्तव्य करतीलंच.. आशा तरी ठेवूया.. गरज आहे ही मानसिकता बदलण्याची.. हे पुरूष बदलण्याची ! अशा गुन्ह्याला जबरदस्त दहशतीची शिक्षा सुनावण्याची – अशी सजा – जी ऐकून त्या झुंडीच नाही , तर कुणाच्याच पुढच्या सात पिढ्या मनातही पाप करू धजल्या नाही पाहिजेत..

रडू येऊ नये म्हणून दात घट्ट मिटून ठेवले तरी डोळ्यातून घळघळ पाणी येतंय. जीव घाबरा होतोय.. रस्त्यावरच्या प्रत्येक मुलीबाळीला सुरक्षित घरी पोचवावंसं वाटतंय.. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, निर्वस्त्र देह कसाबसा हातांनी झाकून – धरणीमाते पोटात घे – असा मूक आक्रोशाचा भाव असलेल्या त्या दोघी मला पळताना दिसत आहेत.. कुठलं जनावरही असं पाशवी होताना ऐकलं नाहीए आपण.. मी माझ्या मुलीला जगाबद्दल काय चांगलं सांगू.. कोणालाच, कधीच अशा बातम्या वाचायला लागू नयेत..

पुष्यमित्र उपाध्यायांची कविताच अंगी बाणावी लागणार आता प्रत्येकीला……सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो.. अब गोविंद ना आयेंगे..”, असे सोनाली कुलकर्णीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “हा अधिक श्रावण आहे, यानंतर श्रावण लागेल”, चाहत्याच्या कमेंटवर प्रथमेश लघाटेने दिलं उत्तर, म्हणाला “तुमच्या माहितीसाठी…”

दरम्यान सोनाली कुलकर्णीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिला समर्थन दिले आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.