अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. ३ नोव्हेंबरला सोनालीचा हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. त्यामुळे ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ प्रदर्शित होण्यास अवघे दोन दिवस बाकी आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाटत पाहत आहे.
गणेश कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ या चित्रपटात सोनालीसह अभिनेता हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अशातच आता सोनालीचे आई-वडीलही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत असल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा – ‘माझा होशील ना’नंतर विराजस कुलकर्णी व गौतमी देशपांडे पुन्हा झळकणार एकत्र; निमित्त मालिका नव्हे तर….
हेही वाचा – “…म्हणून मी ‘अबोली’ मालिका स्वीकारली” अभिनेता सुयश टिळकने सांगितलं कारण, म्हणाला…
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे आई-वडील लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. सोनालीच्या ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ चित्रपटातच हे दोन नवोदित कलाकार पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात सोनालीच्या आई-वडिलांची एंट्री कशी काय झाली? यामागे एक रंजक किस्सा आहे.
सोनालीचे आई-वडील कोणत्या भूमिकेत झळकणार?
‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात होते. त्यावेळी सोनालीचे आई-वडील तिला भेटण्यासाठी सहज सेटवर गेले होते. तेव्हा बसमधील प्रवासाचा सीन चित्रीत होत होता. यावेळी सोनालीचे आई-वडील तिथेच असल्याने दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिली. या संधीला मान देत त्यांनी ही संधी स्वीकारला. त्यामुळे आता सोनालीचे आई-वडील ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ चित्रपटात सहप्रवाशाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच प्रत्येक प्रसंग सहजतेने सांभाळणारी संजुची आई म्हणजेत तन्वी सरपोतदारच्या भूमिकेत सोनाली झळकणार आहे.