अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असल्याने गेल्या काही महिन्यांपासून ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अगदी बॉक्स ऑफिसवर सुद्धा अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाने धुमाकूळ घातला. अवघ्या चार दिवसांमध्ये ‘कल्की 2898 एडी’ने जबरदस्त कमाई करत सर्व रेकॉर्ड्स मोडले. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात ७०० कोटींहून अधिक कमाई केल्याचं समोर आलं आहे. याच बहुचर्चित चित्रपटाशी मराठी कलाविश्वातील एका अभिनेत्रीचं खास कनेक्शन आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे आणि तिचं ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटासाठी काय योगदान आहे जाणून घेऊयात…

‘कल्की 2898 एडी’ चित्रपटात दमदार स्टारकास्टसह दाक्षिणात्य कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. या सगळ्यात आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीने अभिमानास्पद कामगिरी आहे. मराठी चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आजवर तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमात ती दुसऱ्या पर्वाची उपविजेती ठरली होती. आता ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे अनेकांना समजलं असेल. या अभिनेत्रीचं नाव आहे नेहा शितोळे.

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
truti dimri left aashiquie 3
Aashiqui 3 चित्रपटातून ‘या’ अभिनेत्रीचा पत्ता कट? याआधीच्या बोल्ड भूमिका ठरल्या कारणीभूत
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
Ratna Pathak Shah
संदूक: अभिनयाचा श्रीगणेशा

हेही वाचा : Video: “हार्दिकने माझ्याकडे बघून…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याला विश्वविजेत्या भारतीय संघाचा आला अविस्मरणीय अनुभव, म्हणाला…

नेहा बहुरंगी अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम लेखिका सुद्धा आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी डबच्या लिखाणासाठी यापूर्वी नेहाने काम केलेलं आहे. त्यामुळेच तिला आता एवढी मोठी संधी मिळाली आहे. ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या हिंदी डबचा लहानसा क्लायमॅक्स सीन चक्क नेहा शितोळेने लिहिला आहे. याबद्दल तिने स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

“‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचा शेवट मी लिहिलेल्या काही वाक्यांनी होतो. जेव्हा आपण लिहिलेले शब्द कमल हासन सरांच्या तोंडून ऐकायला मिळतात तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. या भव्य चित्रपटाचा लहानसा भाग मला होता आलं यासाठी मी प्रचंड आनंदी आहे.” अशी पोस्ट शेअर करत नेहा शितोळेने आपला आनंद व्यक्त आहे.

हेही वाचा : “खरंतर हे मागच्या वर्षीच अपेक्षित होतं…”, विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक पाहून जितेंद्र जोशीची प्रतिक्रिया

neha
नेहा शितोळेची पोस्ट

दरम्यान, ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, पशुपती आणि राजेंद्र प्रसाद असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. संतोष नारायणन यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. त्याचबरोबर अश्विनी दत्त यांच्या वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Story img Loader