कलाकार मंडळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी देखील चाहत्यांना सांगत असतात. शिवाय आपली परखड मत व्यक्त करत असतात. बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे कलाकार मंडळी ट्रोल सुद्धा होतात. पण काही कलाकार ट्रोलर्संना सडेतोड उत्तर देतात, तर काही जण याकडे दुर्लक्ष करतात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.
या व्हायरल फोटोमध्ये दोन गोंडस मुली आपल्या आई-वडिलांबरोबर बसलेल्या पाहायला मिळत आहेत. यामधील एक गोंडस मुलगी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून दुसरी भारतासाठी खेळणारी प्रसिद्ध खेळाडू आहे.
हेही वाचा – केतकी माटेगावकरची आहेत मजेशीर टोपण नावं; अभिनेत्री म्हणाली…
या फोटोमधील मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून स्पृहा जोशी आहे. तर दुसरी गोंडस मुलगी ही तिची बहीण क्षिप्रा जोशी आहे. स्पृहाने हा जुना फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘सुरक्षा कवच’ असं लिहित तिनं हा फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा – कोकणची शान नेहा पाटीलला मिळाला लावणी सम्राज्ञीचा मान; ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती
स्पृहाचा हा जुना फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. “किती गोड”, “खूप छान”, “मस्त फॅमिली फोटो आहे”, अशा प्रतिक्रिया तिचे चाहते देत आहेत. दरम्यान, स्पृहा सिनेसृष्टीत जशी लोकप्रिय आहे तशी तिची बहीण क्षिप्रा क्रिडा क्षेत्रात लोकप्रिय खेळाडू आहेत. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये स्पृहाने तिच्या बहिणीविषयी सांगितलं होतं.
हेही वाचा – “मी लग्न केलं…” केतकी माटेगावकरचा खुलासा, म्हणाली, “माझा पहिला नवरा…”
हेही वाचा – “मी लग्न केलं…” केतकी माटेगावकरचा खुलासा, म्हणाली, “माझा पहिला नवरा…”
स्पृहा म्हणाली होती की, “मला धाकटी बहीण आहे. तिचं एक वेगळंच पूर्ण करिअर आहे. ती खेळाडू आहे. जेव्हा २०१० साली दिल्लीत कॉमनवेल्थ गेम (राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा) झालं तेव्हा ती इंडियन ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्सची कॅप्टन होती. जवळपास तिनं १५-२० यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं नेतृत्व केलं आहे. राष्ट्रीय पातळीवर तिच्या चॅम्पियनशिपचा रेकॉर्ड आहे. तिच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तिला शिव छत्रपती पुरस्कार मिळाला आहे. ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये क्षिप्रा जोशी हे खूप नावाजलेलं नाव आहे. ती ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये सर्वात तरुण परीक्षक असून ती जागतिक पातळीवर परीक्षण करायला जाते. तसेच तिच्याकडे शिकत असलेल्या मुली आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत आहेत.”