मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्पृहा जोशी. तिच्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अभिनयाबरोबर तिनं कविता, लेखन, सूत्रसंचालन आणि निरागस चेहरा यामुळे प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये तिनं काम केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशा या गुणी अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या स्पृहानं एका मुलाखतीमध्ये न्यूज अँकरिंगचा अनुभव सांगितला. ‘अमूक तमूक’ या युट्यूब चॅनेलवर स्पृहानं नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिनं सांगितलं की, “एका वृत्तवाहिनीचा एक उपक्रम होता, तो आता त्यांनी बहुतेक बंद केलाय. एक सेलिब्रिटी न्यूज अँकर होऊन बातम्या सांगतो, हा त्यांचा उपक्रम होता. मी तिथे गेली होती. त्या दिवशी माझा सगळा माज उतरला. असं नाही की, मला टेलिप्रॉम्पटर वाचायची सवय नाहीये. मला त्याची सवय आहे आणि मला ते येतं. पण त्या क्षणी त्या न्यूज रुममध्ये, त्या न्यूजचं प्रेशर घेऊन बरीच माणसं तुमच्या कानात काहीतरी सांगतायत. त्यात फम्बल (fumble) न होणं हे अशक्य आहे आणि त्यात बऱ्याचदा चुकीचं लिहून येतं. त्यामुळे फम्बल होण्याची पूर्णतः शक्यता आहे. त्यामुळे ते फम्बल होत असतील तर ठीक आहे.”

हेही वाचा – Bigg Boss OTT 2 : ‘वेड’ फेम जिया शंकरची बिग बॉसमधून एक्झिट; पूजा भट्टसह टॉप पाच स्पर्धकांची नावे समोर

पुढे स्पृहा म्हणाली की, ” न्यूज अँकरिंग हे काम खूप कठीण आहे. त्यावेळेस ते सांभाळून त्यांना या शिवायसुद्धा काहीतरी बोलायचं असतं. तुम्हाला फक्त बातमी वाचून चालत नाही, कनेक्शन तुमची तुम्हाला द्यायची असतात. मला त्या वृत्तवाहिनीच्या त्या कार्यक्रमात मज्जा आली. तेव्हा मी हे पण म्हटलं होतं की, आतापर्यंत मला असं वाटलं होतं, यात काय आहे? समोरचं वाचूनच बोलायचं आहे, पण असं नाही. याचा मी खूप चांगला अनुभव घेतला आहे.”

हेही वाचा – “बॉडीमुळे नाही, तर….”, अभिषेक बच्चनने नवोदित अभिनेत्यांना दिला सल्ला; म्हणाला…

दरम्यान, स्पृहा जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तिच्या ‘लोकमान्य’ मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. असं असलं तरी तिचं ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाचे प्रयोग सुरू आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress spruha joshi share news anchoring experience pps