उत्कृष्ट अभिनेत्री, कवियत्री, सूत्रसंचालिका अशी ओळख असणारी स्पृहा जोशी नेहमी चर्चेत असते. स्पृहाने नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच मराठीप्रमाणे हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीचे पुढील पाच वर्षांचे प्लॅन्स ठरले असून तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
अभिनेत्री स्पृहा जोशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच स्पृहाने एक ट्रेंडिग व्हिडीओ केला आहे. ज्यामधून पुढील पाच वर्षांचे तिचे प्लॅन्स काय असणार आहेत? हे सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा – ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल, फोटो शेअर करत म्हणाली “तीन-चार रात्र खूप भयंकर…”
स्पृहाने हा व्हिडीओ शेअर करत लिहिल आहे, “पुढील पाच वर्षांसाठी माझे प्लॅन्स…” स्पृहाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे, “जेव्हा कोणी मला पुढील पाच वर्षांच्या प्लॅन्सबद्दल विचारतं. तेव्हा मी सांगते, मी आणखी दिसायला हॉट होईन. आणखी विचित्रपणा करेन. आणखी श्रीमंत होईन. आणखी भयानक होईन. आणखी अनपेक्षित होईन.”
अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तू खूप सुंदर दिसतेस”, “तू माझी क्रश आहेस”, “स्पृहा मॅडम माझ्या फेव्हरेट अभिनेत्री आहात आणि पुढील पाच वर्षांत पण कायम फेव्हरेट राहाल,” अशा अनेक प्रतिक्रिया स्पृहाच्या व्हिडीओवर आल्या आहेत.
हेही वाचा – लग्नानंतर गौतमी देशपांडे नवऱ्यासह पोहोचली कोकणात, मराठी सोशल मीडिया स्टारने शेअर केले फोटो
दरम्यान, स्पृहाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिच सध्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या कार्यक्रमात तिच्या साथीला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आहे. तसंच स्पृहाचा १८ नोव्हेंबरला ‘सब मोह माया है’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने अभिनेता शर्मन जोशीच्या पत्नीची भूमिका निभावली होती. याआधी स्पृहाने ‘क्लास ऑफ ८३’ आणि ‘अटकन चटकन’ या हिंदी चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ती ‘रंगबाज’ आणि ‘द ऑफिस’ या हिंदी सीरिजमध्येही झळकली होती.