अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाशिवाय स्पृहा उत्तम कवयित्री आणि निवेदक आहे. लवकरच ही हरहुन्नरी अभिनेत्री मावशी होणार आहे. ही आनंदाची बातमी स्पृहाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री स्पृहा जोशीची सख्खी बहीण भारतातील प्रसिद्ध खेळाडू आहे. क्षिप्रा जोशी असं तिचं नाव असून ती स्पृहाची धाकडी बहीण आहे. २०१०मध्ये दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम ( राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा )मध्ये इंडियन ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्सची कॅप्टन क्षिप्रा होती. तिनं १५-२० यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं नेतृत्व केलं आहे. राष्ट्रीय पातळीवर तिच्या चॅम्पियनशिपचा रेकॉर्ड आहे. तिच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तसंच क्षिप्राला शिव छत्रपती पुरस्कार मिळाला असून ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये तिचं खूप नावाजलेलं नाव आहे. हीच स्पृहाची बहीण लवकरच आई होणार आहे. नुकतंच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. याचे फोटो स्पृहाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा – रणबीर कपूर, विकी कौशलनंतर तृप्ती डिमरी ‘या’ चॉकलेट बॉयबरोबर रोमान्स करताना दिसणार; विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार ही नवी जोडी

स्पृहा जोशीने क्षिप्राच्या डोहाळे जेवणाचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच क्षिप्राचा दुसरा फोटो शेअर स्पृहाने लिहिलं की, सुंदर…माझं हे बाळ तिच्या बाळाची वाट पाहत आहे. या खास दिवशी तुमच्याबरोबर मी नव्हते, त्यासाठी माफी मागते. खूप सारं प्रेम.

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस ११’च्या विजेतीने दिग्विजय राठीला केलं समर्थन; शिल्पा शिरोडकरला म्हणाली…

स्पृहा जोशी इन्स्टाग्राम स्टोरी

डोहाळे जेवणासाठी क्षिप्रा जोशीने मजेंटा कलरची सुंदर साडी नेसली होती. ज्यावर चंद्रकोरची डिझाइन पाहायला मिळत आहे. क्षिप्रा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

स्पृहा जोशी इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – १० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री

दरम्यान, स्पृहा जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी तिच्या ‘सुख कळले’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अवघ्या पाच महिन्यांनंतर स्पृहाची ही मालिका ऑफ एअर झाली. त्यानंतर आता स्पृहा नव्या नाटकात पाहायला मिळणार आहे. जयवंत दळवी लिखित व राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘पुरूष’ नाटकात स्पृहा दिसणार आहे. या नाटकात स्पृहासह अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे झळकणार आहेत. ज्येष्ठ नाटककार जयवंत दळवी ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ‘पुरूष’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress spruha joshi sister kshipra joshi baby shower ceremony photos viral pps