मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीला ओळखले जाते. आतापर्यंत तिने अनेक नाटक, मालिका चित्रपटांमधून उत्तम भूमिका साकारल्या आहेत. स्पृहा जोशी ही मांसाहारी पदार्थांवर ताव मारते. नुकतंच तिने गुपचूप लपून केलेल्या पदार्थांबद्दल भाष्य केले आहे.
स्पृहा जोशीने नुकतंच ‘आसोवा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये मांसाहारी पदार्थांवर ताव मारला. यावेळी तिला मांसाहार प्रेमींना कधीही खाण्याची इच्छा होते, मग तुम्हाला जेव्हा असं काही खायची इच्छा असायची, तेव्हा तुम्ही काय करायचा? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने तिच्या घरातील एक गंमत सांगितली.
आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य
“बाबांना न सांगता आम्ही अशा गोष्टी केल्या आहेत. बाबांचा तसा काही आक्षेप नव्हता. पण अनेकदा शाकाहारी खाणारे जे लोक असतात, त्यांना मासे किंवा त्याचा वास आवडत नाही. जर तुम्हाला त्याची सवय नसेल, तर तो वास अवघड जातो. मी आई आणि माझी बहिण आम्ही कट्टर मांसाहार करणाऱ्या आहोत.
त्यामुळे आईकडे एक ठरलेली कोळीण यायची. जी एका डब्ब्यात सुके बोंबील घेऊन यायची. त्यानंतर मग दुपारी कधीतरी मूड आला तर मग आम्ही ते सुके बोंबील गॅसवर भाजून त्यावर लिंबू, तिखट, मीठ वैगरे लावून खायचो.
अनेकदा दुपारच्या वेळी आम्ही ते करायचो. कारण मग बाबा येईपर्यंत घरातला तो वास ज्यांना आवडत नाही तो निघून जाईल. आम्ही हे बरेच वर्ष करायचो”, असे स्पृहा जोशी म्हणाली.
आणखी वाचा : सासू, नवरा आणि वडील शाकाहारी असतानाही स्पृहा जोशी मांसाहार प्रेमी कशी? उत्तर देत म्हणाली…
दरम्यान स्पृहा जोशी ही कट्टर मांसाहार प्रेमी आहे. तिने अनेकदा मासे, चिकन या पदार्थांवर ताव मारताना दिसते. काही दिवसांपूर्वी मांसाहारी पदार्थांवर ताव मारण्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले होते. तिने त्यावर स्पष्टीकरणही दिले होते.