गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री सुकन्या मोने विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. सुकन्या यांनी मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजही त्यांचा अभिनयाचा प्रवास जोमानं सुरू आहे. आजपर्यंतच्या या प्रवासात सुकन्या मोने यांचे अनेक मोठे अपघात झाले. पण तरीही त्यातून त्या कशा सावरल्या? पुन्हा कशाप्रकारे त्यांनी अभिनयाचा प्रवास अविरत ठेवला? याविषयी नुकत्याच त्या एका मुलाखतीत बोलल्या.

अभिनेत्री सुकन्या मोने यांनी नुकतीच ‘अमृता फिल्म’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी सुकन्या यांनी त्यांच्याबरोबर झालेल्या अपघातचे प्रसंग सांगितले. या मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं की, नृत्यासंबंधित एखादा चित्रपट आणि नाटक झालं का? यावर सुकन्या मोने म्हणाल्या, “खरंतर कोणाला माहित नव्हतं मी नृत्य शिकते किंवा मला नृत्य येतं. कारण झालं असं ९०साली मी ‘जन्मगाठ’ नावाचं नाटक करत होते. तेव्हा माझं मी अरंगेत्रम ठरवलं होतं. त्या नाटकावर नंतर ‘काकस्पर्श’ नावाचा चित्रपट केला. तर त्या नाटकामध्ये एक अशी परिस्थिती होती, त्यामधील उमाला आकडी येते आणि ती पडते. त्याच्या अगोदर ज्या कलाकार होत्या त्यांनी मला व्यवस्थित पकडलं होतं. पण पुण्याच्या प्रयोगाला काय माहित त्या मला पकडायच्या विसरल्या. मी त्यांच्या भरोशावरती मागे स्वतःला झोकून दिलं आणि बरोबर एका टोकावरती माझं दोनदा डोकं आपटलं. त्यानंतर मला काही झालं नाही. पण दुसऱ्या दिवशी मी जेव्हा उठले, तेव्हा मला काहीही दिसत नव्हतं. डोक्यात कोणीतरी हातोडा घेऊन मारतंय असं जाणवतं होतं. डॉक्टरना दाखवलं तेव्हा ते म्हणाले, ७२ तास देखरेखीखाली ठेवल्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही. पुण्यातच होते. माझे गुरू संजय गोडबोले त्याच्याकडे होते. ४ दिवस अंधत्व काय असतं, एक दिवस स्मृती काय जाते हे सगळं कळलं होतं. शिवाय तेव्हापासून मला आपल्या अवयवांचं महत्त्व काय असतं हे कळायला लागलं.”

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”

हेही वाचा – मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेत न्यूझीलंडला जात लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने मिळवलं मोठं यश, म्हणाली…

पुढे सुकन्या मोने म्हणाल्या, “पण यावेळी मला असं झालं, खाली वाकले की चक्कर यायची, बसले की चक्कर यायची, झोपलं की चक्कर यायची. सारखी डोळ्यासमोर अंधारी यायची. मग कळलं माझ्या मेंदूवर आघात (brain concussion) झालाय. अंतर निर्माण होऊन त्याच्यामध्ये रक्ताच्या गाठी होतं होत्या. मग इंजेक्शन दिलं तरी बरं होईना. शेवटी माझी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर पुढे सहा महिने खूप काळजी घ्यावी लागली. यामुळे माझं डान्स करणं बंद झालं. उड्या मारायच्या नाहीत, खाली वाकायचं नाही. मग मी यातून बरी झाले आणि मी पुन्हा ठरवलं अरंगेत्रम करूया. पुन्हा सराव सुरू केला. तेव्हा ‘मृत्यूंजय’ नावाची मालिका करत होते, फिल्मसिटीमध्ये सेट लागला होता. त्या सेटवर आम्ही आठ दिवस शूटिंग केलं होतं. पण माहित नाही काय झालं, अचानक पाऊस आला गारा पडू लागल्या. अख्खाच्या अख्खा सेट पडला आणि सेटबरोबर मी ही पडले. त्यावेळेस मी खूप बारीक होते. मला वाटलं उडून जाऊ म्हणून मी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या खांबाला धरून उभी राहिले. पण याच्यासकट मी खाली पडले. त्यामुळे एक खांब माझ्या हातात, दुसरा खांब माझ्या पोठावर पडला. एवढं होऊनही मी सगळं सावरून उठले आणि नंतर मी चक्कर येऊन पडले. मग मी कुठल्यातरी रुग्णालयात होते. मी जागी झाले तेव्हा मीच डॉक्टरांना विचारत होते, काही फॅक्चर वगैरे झालंय का? कारण तोपर्यंत माझे अनेक छोटे-मोठे अपघात झाले होते. तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुम्हाला काहीच झालं नाही. तुम्ही जाऊ शकता.”

“माझ्या गाडीवर झाड पडलं होतं. मी गाडीचा दरवाजा बांधून नेला होता. ९०साली डॉक्टरांनी गाडी चालवणं बंद केलं होतं. कारण माझ्या दृष्टीवर परिणाम झाला होता. त्यावेळेला गोरेगाव ते दादर २० मिनिटांचं अंतर होतं. वाहतूक कोंडी वगैरे काही नव्हतं. फार कमी लोकांकडे गाड्या असायच्या. आम्ही गोरेगावमधून निघालो आणि घरापर्यंत पोहोचल्यानंतर माझा ड्रायव्हर म्हणाला, ताई उतरतायना खाली? ताई एक, नाही दोन नाही. शेवटी त्यांनी माझ्या भावाला बोलवून आणलं आणि सांगितलं, ताई उतरचं नाहीये खाली. तोपर्यंत माझी उजवी बाजू कामातून गेली होती. संवेदना गेल्या होत्या. मग माझ्या भावाने उचलून वरती नेलं आणि मी सहज बाहेर बघितलं पाऊस सुरुच होता. मी इतकी जोरात किंचाळले की माझं स्वरयंत्र आकुंचन होऊन तिथे गाठ झाली. इतकी मी जोरात ओरडले होते. मला मोठा धक्का बसला होता. पुन्हा माझी स्मृती गेली. २३ वर्षांची होती. ‘मैं कहा हूं’, असं माझं झालं होतं. मला हिंदुजामध्ये दाखल केलं. त्यादरम्यान माझ्या वडिलांना अल्झायमर झाला होता. त्यामुळे वडील माझे १०व्या मजल्यावर आणि मी १४व्या मजल्यावर होते. माझ्या आईला सांगण्यात आलं, दोघांना असंच्या असं घेऊन जा. काही होणार नाही. पण माझी आई इतकी जिद्दीची आहे. ती आता ९० वर्षांची आहे अजूनही जिद्दीची आहे. तिने सांगितलं, जोपर्यंत माझे दोन्ही पेन्शंट स्वतःच्या पायाने घरी चालत येत नाहीत तोपर्यंत मी इकडून हलणार नाही. तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही काहीही करा.”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ : “मिसेस सायली माफ करा”, बायकोची समजूत काढण्यासाठी अर्जुनने बनवला खास प्लॅन, पाहा प्रोमो

“मग मला शॉक ट्रिटमेंट दिली. माझं स्वरयंत्राची शस्त्रक्रिया केली. काही ना काही केलं, जे काही जमले ते केलं आणि मला पुर्नजन्म दिला. मला उभं केलं. घरी आल्यानंतर कळतं होतं की माझं गोळ्यांमुळे वजन वाढायला लागलं होतं. शॉक ट्रिटमेंटमुळे माझी जॉ लाइन चेंज झाली होती. केस गळत होते. खूप गोष्टी होतं होत्या. हे सगळं घेऊन काम करणं शक्यचं नाहीये. म्हणजे शेवटच्या डोकापर्यंत मी पोहोचले होते. तेव्हा माझी आई म्हणाली, हे चालणार नाही. माझ्या घरातून आत्महत्या करायची नाही. उठायचं आणि कामाला लागलाचं. तेव्हा माझ्या आईचा मला इतका राग आला होता की, या बाईला दिसतंय माझी काय अवस्था आहे आणि मला कामाला लावतेय. पण त्यावेळेला तिने मला उठवलं नसतं तर मी आज दिसले नसते. तो आत्मविश्वास तिने मला दिला. माझी आई मला शिवाजी मंदिरमध्ये फिरवून आणायची. रवींद्र नाट्य मंदिराला फिरवून आणायची. छबीलदासला घेऊन जायची. ती तिची एक थेरपी होती. ती म्हणाली, मला माहिती ती इथूनच उभी राहणार. तिला इथूनच उर्जा मिळणार आणि तिथून मला उर्जा मिळाली आणि पुन्हा काम करायला सुरुवात केली,” असं सुकन्या मोनेंनी सांगितलं.