मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. क्रांती तिच्या जुळ्या मुली झिया आणि झायदा यांचे रिल्स, तिच्या कुटुंबीयांचे किस्से इन्स्टाग्रामवर शेअर करते आणि हे सगळे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत. क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडीओवर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार कमेंट करीत तिचे कौतुक करतात. आता तर सुकन्या मोने यांनी थेट क्रांतीप्रमाणे व्हिडीओ बनवीत तिची नक्कल केली असून यावर स्वत: क्रांतीनेही कमेंट केली आहे.

हेही वाचा : Video: “‘पठाण’ हिट झाला म्हणून इतका माज…!” शाहरुख खानची ‘ती’ कृती पाहून नेटकरी नाराज

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
an old lady burst firecrackers in hand shocking video goes viral on social media
“आज्जी हे चुकीचं आहे” हातात धरून फोडले फटाके, आज्जीचा प्रताप पाहून… VIDEO होतोय व्हायरल

क्रांती रेडकर इन्स्टाग्रामवर नेहमी एका विशिष्ट शैलीत बोलत व्हिडीओ शेअर करते. अगदी याचप्रमाणे सुकन्या मोनेंनीही गाडीत बसून क्रांतीच्या स्टाइलमध्ये व्हिडीओ बनवला आहे. यात सुकन्या मोने अमृता संत हिला उद्देशून म्हणतात, “वेळेत न येणाऱ्या माणसांचे काय करायचे आपण…बरं मी निघाले होते पुण्याला…कामासाठी… पण, या ज्या बाई आहेत, या येणार होत्या साडेपाच वाजता, त्या आल्या आहेत पाच पन्नास वाजता, मग त्यानंतर झाला उशीर…हे जे आम्हाला इथे ट्राफिक लागले आहे त्याचे आता काय करायचे सांग अमृता?” यावर अमृता संत म्हणते, “मला ॲसिडिटी होऊनही मी सकाळी उठून आले, त्याचे काही कौतुक नाही.” यानंतर पुन्हा सुकन्या मोने उत्तर देतात, “हे असं आहे…सतत मी कशी चांगली, मी कशी बरोबर हे ऐकायचे आहे.”

हेही वाचा : “प्रत्येक कलाकाराने…” अमृता खानविलकरबद्दल आशिष पाटीलने मांडले मत

क्रांती तिच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये बहुतांश वेळा “हे असं आहे” किंवा “तुझे काय करायचे गं” असे म्हणत असते. याच ढंगात सुकन्या मोनेंनी क्रांतीची हुबेहूब नक्कल केली आहे. क्रांती रेडकरने स्वत: सुकन्या मोनेंच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तसेच इतर युजर्सनीही “तुझे काय करायचे गं? किती परफेक्ट नक्कल केली आहेस… कमाल!” तर काहींनी “जमले आहे सुकन्याताई” असे म्हणत सुकन्या मोने यांच्या व्हिडीओला पसंती दिली आहे.