सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुनील बर्वे मुख्य भूमिकेत म्हणजेच सुधीर फडके यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. तर अभिनेत्री सुखदा खांडकेकर ही माणिक वर्मांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच तिच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुखदा खांडकेकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिला एक चाहतीने लिहिलेले पत्र पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने त्या चाहतीचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा : कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर ‘संगीत देवबाभळी’ नाटक घेणार प्रेक्षकांचा निरोप

सुखदा खांडकेकरची पोस्ट

“पत्ररूपी बक्षिस, काल संध्याकाळी आलेल्या अनेक पार्सल्स् मधून ‘दिवाळी भेट’ म्हणून आलेला एक पूडा उघडायला घेतला आणि एक कधीही न विसरता येण्यासारखं सरप्राईज मिळालं..

आता अजून एखादा मिठाईचा बॅाक्स किंवा गोडाधोडाचं काहीतरी असेल म्हणुन पुडा उघडला तर निघालं गोडच, पण एक पत्र…… ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ ह्या स्व. बाबूजींवर येऊ घातलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश देशपांडे ह्यांनी ह्या चित्रपटात मी साकारलेल्या माणिक वर्मांच्या भुमिकेचं कौतुक करणारा पहिलाच शब्द,

तो म्हणजे ‘ प्रिय माणिकबाई ‘ वाचून तिथेच काळजाचा ठोका चुकला… पुढे वाचायला सुरूवात केली खरी पण डबडबलेल्या डोळ्यांनी पुढचं काही दिसेना… चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्या साठी असा पुरस्कार मिळणं ह्याहून मोठं भाग्य कुठलं.. योगेश देशपांडे मनापासून आभार ह्या ‘अमृताहूनी गोड’ भेटीसाठी…

स्व. बाबूजी आणि स्व. माणिकबाई ह्यांचे स्वर आशीर्वाद रुपी ह्या नंदादीपासारखे कायम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तेवत राहोत. #कृतज्ञ”, असे सुखदा खांडकेकरने म्हटले आहे.

आणखी वाचा : “दिवाळीच्या दिवशी श्री राम घरी येणं निव्वळ योगायोग की…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

दरम्यान, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुनील बर्वे यांच्याव्यतिरिक्त सागर तळाशीकर (ग. दि. माडगूळकर), मिलिंद फाटक (राजा परांजपे), सुखदा खांडकेकर (माणिक वर्मा), धीरेश जोशी (वीर सावरकर), शरद पोंक्षे (डॉ. हेडगेवार) ही कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिका़त दिसणार आहेत. योगेश देशपांडे या चित्रपटाच्या लेखन व दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sukhada khandkekar fan send letter to her for congratulate sudhir phadke biopic role nrp