मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानला ओळखले जाते. आपल्या अभिनयाने तेजश्रीने मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. तेजश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. नाटक मालिका चित्रपटाच्या माध्यमातून तेजश्री चाहत्यांचे मनोरंजन करत आली आहे. आता लवकरच तेजश्री नव्या चित्रपटात झळकणार आहे.
तेजश्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे व्हिडीओ प फोटो शेअऱ करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. अशातच तेजश्रीने सोशल मीडियावर आपल्या नव्या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअऱ केली आहे. तेजश्रीने आपल्या इनस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत केली आहे. या फोटोमध्ये तिने नव्या चित्रपटाची झलक दाखवली आहे.
या फोटोमध्ये ती नव्या चित्रपाटसाठी डबिंग करताना दिसत आहे. फोटोमध्ये हॅशटॅग त्रदैव लग्नम रील १ असे लिहिलेले दिसत आहे. तेजश्रीने ही पोस्ट अभिनेता सुबोध भावे व दिग्दर्शक आनंद गोखले यांना टॅक केली आहे. या पोस्टवरुन या चित्रपटात तेजश्रीबरोबर सुबोध भावेही झळकणार असल्याचे समोर आले आहे. तेजश्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून तेजश्री घराघरांत पोहचली, तिच्या ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. ‘ती सध्या काय करते’ चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली होती. सध्या तेजश्री प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता हे पात्र साकारत आहे. नुकताच तिचा पंचक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.