मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. अनेक चित्रपट, मालिका, वेबसीरिज या मनोरंजनाच्या विविध माध्यमांत हटके भूमिका साकारत तेजस्विनीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या या भूमिकांचे प्रचंड कौतुकही झाले. तेजस्विनी पंडित आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. काही महिन्यांपूर्वी तेजस्विनीने ‘दुनियादारी’ चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला होता.

तेजस्विनी पंडितने काही दिवसांपूर्वी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. ‘अथांग’ या वेबसीरिजद्वारे तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले.  या वेबसीरिजच्या निमित्ताने तेजस्विनीने एक मुलाखत दिली. सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत तिने तिच्या करिअरबद्दल खुलासा केला आहे. यात तिने तिचा अभिनेत्री ते निर्माती असा प्रवास उलगडला आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेने उरकलं गुपचूप लग्न, पाहा फोटो 

Amit Shah Said This Thing About UCC
Amit Shah : UCC बाबत अमित शाह यांची मोठी घोषणा, आदिवासी बांधवांना काय दिलं आश्वासन?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
loksatta readers feedback
लोकमानस: अर्थकारणाच्या विकेंद्रीकरणातून ‘संघराज्य’
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
diwali muhurat trading
विश्लेषण: शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? यंदा कधी? त्याचे महत्त्व काय?
modi with army
इंचभर भूमीचीही तडजोड नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावले; कच्छमध्ये जवानांबरोबर दिवाळी

तिने संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाबद्दल भाष्य केले. यावेळी ती म्हणाली, “‘दुनियादारी’ या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकरने शिरीन ही भूमिका साकारली होती. मात्र ही भूमिका मला ऑफर करण्यात आली होती”, असा मोठा गौप्यस्फोट तेजस्विनी पंडितने यावेळी केला.

“मला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटानंतर अनेक चित्रपटांच्या आणि विविध धाटणीच्या भूमिका आल्या. मात्र त्यांना मी स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे यामुळे माझ्या करिअरवर मोठा परिणाम झाला. नाहीतर आज मी एका वेगळ्या ठिकाणी असते”, असे तेजस्विनी पंडितने म्हटले.

आणखी वाचा : “नक्की काय दाखवायचं आहे…” नव्या फोटोशूटमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “मराठी इंडस्ट्रीमध्ये…”

‘एक वेगळी दुनिया एक वेगळीच दुनियादारी’ असे म्हणत ‘दुनियादारी’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजला. संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटात स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, रिचा परीयाली यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले.

‘दुनियादारी’ हा चित्रपट त्यातील पात्र आणि कलाकारांमुळे गाजला. या चित्रपटात सई ताम्हणकरने सत्तरीच्या दशकातील शिरीन भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. यामुळे सईच्या करिअरला एक वेगळीच दिशा मिळाली.