टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेले ४ दिवस उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी ८ ऑक्टोबरला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अविनाश जाधव यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधून महाराष्ट्रातील टोलसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. या टोल पार्श्वभूमीवर आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करत ट्वीट केलं आहे. यामध्ये अभिनेत्री नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : समुद्रकिनारी आधी बिकिनी अन् आता…; ट्रोलर्सला मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मराठी संस्कृतीचा…”

टोलदरवाढीवर गेल्या काही महिन्यांपासून मराठी कलाविश्वात अनेक कलाकारांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता तेजस्विनी पंडितने याप्रकरणी भाष्य केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. “शिवसेना-भाजपाची युती असताना आम्ही जी घोषणा तेव्हा केली होती त्यानुसार आता राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही चारचाकी आणि छोट्या गाड्यांना मुक्ती दिली आहे. महाराष्ट्रातील टोलवर आपण फक्त कमर्शियल-मोठ्या गाड्यांचे टोल घेतो.” असं देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

हेही वाचा : संकल्प काळे ठरला ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ चा विजेता, बक्षीस म्हणून मिळाले ‘इतके’ रुपये

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करत तेजस्विनी पंडित म्हणते, “म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून!! तुमचं हे विधान कसं असू शकतं? तुम्हालाही फसवणूक झाली असे वाटत असेल तर शेअर करा!”

हेही वाचा : नेहा पेंडसेने केले Eggs Freeze; मातृत्त्वाबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मला आई व्हायचंय पण…”

तेजस्विनी पंडितच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “उद्या पासून टोल देणे बंद.कोणी विचारलं तर हा व्हिडिओ दाखवा” असं म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या एका युजरने, “राज्य मार्ग हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो. राष्ट्रीय महामार्गावर केंद्राचं नियंत्रण असतं. तिथे राज्य सरकार काही करू शकत नाही.” अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या ट्वीटवर दिली आहे. दरम्यान, यासंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत अशी माहिती त्यांनी रविवारी दिली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress tejaswini pandit reaction on toll shared video of dcm devendra fadnavis sva 00
Show comments