नव्या संसदभवनाच्या सुरक्षाभंगाच्या मुद्द्यावरून सध्या हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजत आहे. संसदेच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी करुन सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या ४९ खासदारांवर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेच्या १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने यासंदर्भात पोस्ट शेअर करून आपलं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदारांच्या निलंबनानंतर लोकशाहीला धाब्यावर बसवण्यात आलं आहे असं म्हणत तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टसह अभिनेत्रीने सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : स्वानंदी टिकेकरच्या लग्नाला फक्त ६ दिवस बाकी? होणाऱ्या नवऱ्याने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

“चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही…! लोकशाही बसली धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास?” असा प्रश्न अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या पोस्टद्वारे उपस्थित केला आहे.

हेही वाचा : ऐश्वर्या राय की अभिषेक बच्चन, कोण चांगला अभिनय करतं? श्वेता बच्चनने दिलेलं उत्तर चर्चेत

तेजस्विनी पंडितची पोस्ट

दरम्यान, अभिनेत्री तेजस्विनी पंडित नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर आपलं स्पष्ट मत मांडताना दिसते. यापूर्वी तिने एक्स पोस्ट करत राज्यातील टोलनाक्यांसंर्दभात प्रश्न उपस्थित केले होते. आता खासदारांच्या निलंबनानंतर तिने केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. याशिवाय तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री नुकतीच ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात झळकली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress tejaswini pandit reacts on mps suspended including supriya sule from loksabha sva 00
Show comments