गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हीच नाव चांगलंच चर्चेत आहे. तिचे ट्वीट्स हे सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी तिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर करत तिखट ट्वीट केलं होतं. ज्यानंतर तेजस्विनीच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरची ब्लू टिक हटवली गेली होती. या सर्व प्रकरणामुळे तेजस्विनी चांगलीच चर्चेत आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी तेजस्विनीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास ट्वीट केलं होतं. जे चांगलंच व्हायरल झालं होतं. राज ठाकरेंचं भरभरुन कौतुक या ट्वीटमध्ये अभिनेत्रीनं केलं होतं. त्याच ट्वीटविषयीचं स्पष्टीकरण नुकतंच तिने एका मुलाखतीमधून दिलं आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’मधील ‘या’ अभिनेत्रीने दिली होती ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेसाठी ऑडिशन, पण…

‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलला अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिला राज ठाकरेंविषयीच्या ट्वीटबाबत विचारण्यात आलं. तेव्हा तेजस्विनी म्हणाली, “आजही हे ठामपणे सांगेन. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, हे त्यांचं नाही. कारण कुठल्याही मराठी माणसाला कधीही कुठल्याही बाबतीत कुठलीही समस्या आली, तर पहिलं नाव आणि पहिला दरवाजा कुठला ठोठावला जातो तो म्हणजे शिवतीर्थाचा, जो राज साहेबांचा आहे.”

हेही वाचा – “त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती…” ऐश्वर्या नारकर यांचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाल्या…

पुढे तेजस्विनी म्हणाली, “एखाद्या नेत्याविषयी इतका विश्वास का वाटतो? कारण तो माणूस सातत्याने मराठी माणसासाठी काम करतोय. मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम करतोय. मी त्या माणसासाठी ट्वीट केलं किंवा मी त्यांच्या बाजूने उभी राहिले किंवा मला जे योग्य वाटलं त्याच्या बाजूने उभी राहिले, याचा मला खूप अभिमान आहे. मला याच्यात अजिबात काही गैर वाटतं नाही. मला त्यांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress tejaswini pandit says raj thackeray is not the chief minister thi it is maharashtra misfortune that pps
Show comments